ETV Bharat / state

Mumbai roads मुंबईतील रस्त्यांच्या कामांना कंत्राटदारांचा अल्प प्रतिसाद, अटी बदलून दुसऱ्यांदा काढण्यात येणार निविदा

author img

By

Published : Nov 9, 2022, 9:36 AM IST

पावसाळा सुरु झाला की ( concrete work for Mumbai road ) मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारे काँक्रिटचे रस्ते बांधणीवर पालिकेने भर दिला आहे. मुंबईकरांना चांगले रस्ते, खड्डेमुक्त रस्ते निर्माण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने ४०० किलोमीटरचे रस्ते बनवण्यासाठी ५८०० कोटी रुपयांच्या निविदा ऑगस्ट २०२२ मध्ये काढल्या होत्या.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

मुंबई : मुंबईतील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण करण्याच्या ( road work in Mumbai ) कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र कठोर अटी शर्तीमुळे अल्प प्रतिसाद मिळाल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदेत अटी व शर्तींचे पुनर्विलोकन करण्यात येणार आहेत. त्यात गुणवत्तेशी तडजोड न करता बदल केला जाणार आहे. अत्याधुनिक ( BMC tender for road work ) तंत्रज्ञानाचा समावेश करून नव्याने निविदा मागवल्या जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.

निविदा केल्या रद्द - पावसाळा सुरु झाला की ( concrete work for Mumbai road ) मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारे काँक्रिटचे रस्ते बांधणीवर पालिकेने भर दिला आहे. मुंबईकरांना चांगले रस्ते, खड्डेमुक्त रस्ते निर्माण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने ४०० किलोमीटरचे रस्ते बनवण्यासाठी ५८०० कोटी रुपयांच्या निविदा ऑगस्ट २०२२ मध्ये काढल्या होत्या. यामध्ये शहर १, पूर्व उपनगरे १ आणि पश्चिम उपनगरे ३ अशा एकूण पाच निविदांकारानी त्यात भाग घेतला. मात्र निविदेत कठोर अटी, शर्तीमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंत्राटदार कंपन्यांचा निविदांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने या निविदा प्रक्रिया पालिकेने रद्द केल्या.

दोन आठवड्यात नव्याने निविदा : निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने मुंबईकरांची खड्डेमुक्त रस्त्यांची प्रतिक्षा लांबणार असून या कामाचा खर्च ७ हजार कोटींवर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी पालिकेने जोरदार तयारी केली आहे. अधिकाधिक आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पालिकेचा प्रयत्न असणार आहे. येत्या दोन आठवड्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवल्या जाणार असल्याचे वेलारासू यांनी सांगितले. त्यामुळे वर्षानुवर्ष खड्डेमय रस्त्यांचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

त्यामुळे निविदांना अल्प प्रतिसाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँक्रिटचे रस्ते निर्माण करण्यासाठी पालिकेला निर्देश दिले होते. त्यानंतर पालिकेने निविदा काढल्या. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता व दर्जा उत्तम राखण्यासाठी या निविदांमध्ये मोठ्या नामांकीत कंपन्या समाविष्ट होण्यासाठी निविदा प्रक्रियेत १५ कठोर अटी व शर्ती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. या अटींमुळे सदर निविदांना अत्यल्प प्रतिसाद प्राप्त झाला, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. या अटींमुळे निविदांना अल्प प्रतिसाद मिळाला. ही बाब लक्षात घेता, सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे महानगरपालिकेने निर्णय घेतला. नव्या निविदेत काही कठोर अटी व शर्तींचे पुनर्विलोकन करण्यात येणार असून त्यात गुणवत्तेशी तडजोड न करता बदल करण्याचा मानस असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.