ETV Bharat / state

मुंबईतील कोरोनायुद्धात आठ 'आयएएस' अधिकाऱ्यांची फौज, 'ही' असणार जबाबदारी - news for IAS officers

मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची फौज मुंबई महापालिकेत पाठवली. नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या 8 आयएएस अधिकाऱ्यांना आपली कामे वाटून दिली आहेत. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे करावी लागणार असल्याचे पालिका आयुक्तांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : May 13, 2020, 10:59 AM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची फौज मुंबई महापालिकेत पाठवली. या अधिकाऱ्यांनी कोणती कामे करायची हे निश्चित नव्हते. मात्र, नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या 8 आयएएस अधिकाऱ्यांना आपली कामे वाटून दिली आहेत. तसे परिपत्रकच आयुक्तांनी काढले आहे. या परिपत्रकानुसार रुग्णालयांचे नियंत्रण, उपचार, ट्रेसिंग, लॉकडाऊन शिथील झाल्यास उपाययोजना, गरजूंना होणार्‍या खाद्य वाटपाबरोबरच पालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सर्व सेवा-सुविधांचा नियमित आढावा घेऊन त्याचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या रोखण्याचे काम आणखी प्रभावीपणे करण्यासाठी राज्य सरकारने पालिका आयुक्तांसह 8 आयएएस अधिकारी पालिकेत पाठवले आहेत. त्यापैकी पालिकेच्या सात झोनमध्ये सात सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दहा दिवसांवरून वीस दिवसांवर आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. यानंतर आता कोरोना रोखण्यासाठी आणखी प्रभावीपणे काम करण्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकार्‍यांवर कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयएएस मनीषा म्हैसकर यांच्याकडे रुग्णालयांतील बेडची व्यवस्था पाहणे, सर्व रुणालयांच्या डीनकडून आढावा घेणे, समन्वयासाठी गट तयार करून काम करावे लागणार आहे. सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता म्हैसकर यांना दररोज आपला अहवाल देतील.

आयएएस अश्विनी भिडे या पालिकेच्या वॉर रूमचे मॉनिटरिंग करतील. शिवाय काँटॅक्ट ट्रेसिंग, क्वारंटाईन, कोव्हिड-19 सेंटर आणि प्रतिबंधित क्षेत्रांचे व्यवस्थापनासंबधातील गोष्टींवर नियंत्रण ठेवून काम करतील.

आयएएस संजीव जयस्वाल यांच्यावर गरजूंना होणार्‍या खाद्यवाटपासह स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याबाबत राज्य सरकारशी समन्वय, त्यांचे प्रश्न, राज्य शासनाच्या निर्देशानुसार याबाबत येणार्‍या आदेशांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. शिवाय लॉकडाऊन शिथील झाल्यास त्याची मुंबईत अंमलबजावणी कशी करायची या संदर्भात पॉलिसी बनवण्याचेही काम जयस्वाल यांच्यावर असेल.

आयएएस सुरेश काकाणी यांच्याकडे मोठी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचे व्यवस्थापन, डिस्चार्ज प्रोटोकॉल आणि आरोग्य विभागाचे प्रशासन सांभाळण्याची जबाबदारीही असेल.

आयएएस पी.वेलरासू यांच्यावर पावसाळापूर्वीचे नियोजन म्हणजेच नालेसफाई, रस्ते, पूल बांधणी अशा कामांसह राष्ट्रीय प्रवाशांचे स्क्रिनिंग, क्वारंटाईन आणि वैद्यकीय साधनांची खरेदी आणि पुरवठा या कामांवर नियंत्रण आणि लक्ष ठेवावे लागेल.

आयएएस प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांच्यावर कोव्हिड योद्धा नेमणे, स्वयंसेवक, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, असे आरोग्य कर्मचारी नेमण्याची जबाबदारी असेल.

आयएएस डॉ. एन. रामास्वामी यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयाची बेड क्षमता तेराशे करणे, आवश्यक वैद्यकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे, आरोग्य कर्मचार्‍यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे आणि सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असेल.

आयएएस आशुतोष सलील हे कोव्हिड केअर सेंटर-2 आणि 3 ची मोठ्या प्रमाणात निर्मिती, पालिकेला सहकार्य करणार्‍या म्हाडा, सिडकोशी समन्वय साधणे, ऑक्सिजन तसेच अतिदक्षता विभागाची व्यवस्था पाहणे, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, सीएसआर संबंधित कामे, अतिरिक्त आयुक्तांशी समन्वय, डाटा मॅनेजमेंट अशी कामे करतील. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे करावी लागणार असल्याचे पालिका आयुक्तांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा - कांदिवलीत 39 लाखांचा गुटखा जप्त; राज्य उत्पादन शुल्कच्या युनिट ११ ची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.