मुंबई: 4 महिन्यापूर्वी राज्यामध्ये सत्तांतर नाटक घडलं. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारून महाविकास आघाडी सरकार पाडले. मात्र सरकार पडणार याची चाहूल लागता महाविकास आघाडी सरकारने काही निर्णय घेतले होते. या निर्णयामध्ये आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभाग अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय यांना स्थगिती देण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केला आहे.
३८१ कोटींची कामे करण्याचा निर्णय: महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या एक दिवस आधी पर्यटन विभागाकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत काम थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत ३८१ कोटींची कामे करण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला होता. मात्र या योजना बाबत घेतलेला निर्णय संगीत करत असून पुढील आदेश येईपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, असा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे.
पर्यटन विकास योजनेला मंजुरी: उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देण्याआधी आदित्य ठाकरे यांनी 2022-23 च्या ३८१ कोटी रुपयाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यांमधील पर्यटन विभागासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जाणार होते. तर या सोबतच एम टीडीसीच्या २१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
आदित्य ठाकरे यांनी दिलेले आदेश रद्द: या निर्णयावर देखील स्थगिती देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. सरकार बदलल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती उठवली होती. यासंबंधी २ नोव्हेंबरला तसे आदेशही काढण्यात आले होते. त्यामुळे या कामांसाठी विभागाकडून पत्र व्यवहार सुरू झाला होता. मात्र काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर शासन निर्णय काढून आदित्य ठाकरे यांनी दिलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत.