ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 806 नवे रुग्ण तर, 64 मृत्यू, कोरोनाग्रस्तांचा आकडा 86132 वर

मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 806 रुग्ण आढळून आले असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 86 हजार 132 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4 हजार 999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 58 हजार 137 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे सध्या कोरोनाचे 22 हजार 996 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मुंबईत पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत कोरोनाचे 806 नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे 806 नवे रुग्ण
author img

By

Published : Jul 7, 2020, 10:06 PM IST

मुंबई : कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 806 रुग्ण आढळून आले असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 86 हजार 132 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4 हजार 999 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 985 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह, डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 58 हजार 137 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 996 सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर 67 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 806 रुग्ण आढळून आले आहेत. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. या 64 मृत्यूंपैकी 54 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 44 पुरुष आणि 20 महिला रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये 5 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 40 जणांचे वय 60 वर्षावर तर 19 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 58 हजार 137 वर पोहोचला आहे. तर, मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 86 हजार 132 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4 हजार 999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 58 हजार 137 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 996 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 67 टक्क्यांवर -

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 67 टक्क्यांवर पोहचला आहे. 29 जून ते 6 जुलैपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.58 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 44 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 757 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभाग कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 352 इमारतींमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 63 हजार 120 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.