मुंबई: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच आहे. 14 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 80 लाख 126 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामधून बरे होण्याचा दर 98.11 टक्के आहे. दाखल झालेल्या रूग्णांपैकी 30 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या आहेत. मुंबईत 1634 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 1056 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात इतके सक्रिय रुग्ण: राज्यात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी एक हजारावर कोरोना रुग्णांची नोंद झाली. बुधवारी १११५, गुरुवारी १०८६ तर आज ११५२ रुग्णांची नोंद झाली आहे. काल बुधवारी ९, गुरुवारी १ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी ४ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासात ११५२ रुग्णांची तर ४ मृत्यूंची नोंद झली आहे. ९२० रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५४ हजार ५२९ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७५ मृत्यूची नोंद झाली आहे. ८० लाख १२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे ५९२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १६४३, ठाणे १०५६, पुणे ७४७, नागपूर ७७९, रायगड २५४, पालघर १८३, सांगली १८०, सोलापूर १३३, उस्मानाबाद १३३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढला: सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन नियमावली लागू केली; परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. चाकरमानी व इतर सर्वसामान्य नागरिक हे पालिकेच्या बसेसचा वापर करतात. यामुळे प्रवाशांना पुरश्या बसेस उपलब्ध होणे गरजेचे आहे; मात्र तसे होत नसल्याने प्रवासी बसमध्ये गर्दी करतात. बसमधून दाटावाटीने प्रवास करावा लागतो, त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. दरम्यान दुसरीकडे नियमानुसार प्रवास करण्याच्या सूचना चालक व वाहकांकडून प्रवाशांना केल्या जातात, मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहकांनी सांगितले.