ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १ हजारावर रुग्णांची नोंद; प्रशासनाची चिंता वाढली - 1000 corona patients recorded in state on Friday

राज्यात आज (शुक्रवारी) सलग तिसऱ्या दिवशी एक हजारावर कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी १११५, गुरुवारी १०८६ तर आज ११५२ रुग्णांची नोंद झाली आहे. काल बुधवारी ९, गुरुवारी १ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आज ४ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update
कोरोना विषाणू
author img

By

Published : Apr 14, 2023, 8:49 PM IST

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात ११५२ रुग्णांची तर ४ मृत्यूंची नोंद झली आहे. ९२० रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५४ हजार ५२९ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७५ मृत्यूची नोंद झाली आहे. ८० लाख १२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे ५९२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १६४३, ठाणे १०५६, पुणे ७४७, नागपूर ७७९, रायगड २५४, पालघर १८३, सांगली १८०, सोलापूर १३३, उस्मानाबाद १३३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत २८४ नवे रुग्ण: मुंबईत बुधवारी ३२० रुग्णांची नोंद झाली होती. काल गुरुवारी त्यात घट होऊन २७४ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन २८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज मुंबईत १ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १६४३ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख ६० हजार १०३ रुग्णांची तर १९ हजार ७५३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णालयात ११८ रुग्ण दाखल असून ४२ रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासली आहे.

मास्क वापरा: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा. पालिका रुग्णालय आणि कार्यालयात मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढला: गर्दी टाळण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन नियमावली लागू करते; परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. चाकरमानी व इतर सर्वसामान्य नागरिक हे पालिकेच्या बसेसचा वापर करतात. यामुळे प्रवाशांना पुरश्या बसेस उपलब्ध होणे गरजेचे आहे; मात्र तसे होत नसल्याने प्रवासी बसमध्ये गर्दी करतात. बसमधून दाटावाटीने प्रवास केला जात असल्याने, कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. दरम्यान दुसरीकडे नियमानुसार प्रवास करण्याच्या सूचना चालक व वाहकांकडून प्रवाशांना केल्या जातात, मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहकांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik News : देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामस्थांनी चक्क गाव विकायला काढले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.