मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज (27 मे) राज्यात 21 हजार 273 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 56 लाख 72 हजार 180 इतकी झाली आहे. आज राज्यात 34 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 52 लाख 76 हजार 203 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 425 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
* गेल्या 24 तासात 21 हजार 273 नवीन रुग्णांची नोंद
* राज्यात आतापर्यंत 56 लाख 72 हजार 180 एकूण रुग्णांची नोंद
* राज्यात गेल्या 24 तासात 34 हजार 370 रुग्णांची कोरोनावर मात
* राज्यात आतापर्यंत 52 लाख 76 हजार 203 रुग्णांची कोरोनावर मात
* राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 1 हजार 41
* राज्यात गेल्या 24 तासात 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू
कोणत्या जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद
- मुंबई महानगरपालिकाा- 1258
- ठाणे - 206
- ठाणे महानगरपालिका- 158
- नवी मुंबई महानगरपालिका- 105
- कल्याण डोंबिवली महापालिका- 205
- मीरा भाईंदर महानगरपालिका- 138
- पालघर- 326
- वसई विरार- 201
- रायगड- 466
- पनवेल- 144
- नाशिक- 679
- नाशिक मनपा- 355
- अहमदनगर- 1406
- पुणे - 1287
- पुणे मनपा- 637
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 385
- सोलापूर- 931
- सातारा - 2561
- कोल्हापूर- 1326
- कोल्हापूर मनपा- 554
- सांगली- 1167
- सांगली मनपा- 160
- सिंधुदुर्ग- 512
- रत्नागिरी- 437
- लातूर - 155
- उस्मानाबाद- 456
- बीड- 596
- अकोला - 217
- अकोला मनपा- 148
- अमरावती - 412
- यवतमाळ- 365
- बुलढाणा- 559
- वाशिम- 315
- नागपूर - 188
- नागपूर मनपा- 263
हेही वाचा - दिलासादायक..! रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर, 21 हजार 273 नवे रुग्ण