ETV Bharat / state

मुंबई हर्ड इम्युनिटीच्या उंबरठ्यावर, पालिकेच्या सर्व विभागात क्लस्टर सर्वेक्षणाची गरज - मुंबई हर्ड इम्युनिटीच्या उंबरठ्यावर

महापालिकेने केलेल्या सेरो सर्व्हेत झोपडपट्टी विभागात ५७ टक्के, तर इतर विभागात १६ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी पाहता हा सर्व्हे पालिकेच्या २४ पैकी ३ विभागांचा असला तरी यावरून मुंबई हर्ड इम्युनिटीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Need to conduct cluster survey in 24 sections for Herd Humanity statistics in mumbai
मुंबई हर्ड ह्युमिनिटीच्या उंबरठ्यावर
author img

By

Published : Jul 31, 2020, 5:28 PM IST

मुंबई - महापालिकेने केलेल्या सेरो सर्व्हेत झोपडपट्टी विभागात ५७ टक्के, तर इतर विभागात १६ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी पाहता हा सर्व्हे पालिकेच्या २४ पैकी ३ विभागांचा असला तरी यावरून मुंबई 'हर्ड इम्युनिटी'च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र, हर्ड इम्युनिटीची नेमकी आकडेवारी समोर यावी म्हणून पालिकेने आपल्या २४ विभागात क्लस्टर सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे मत मुंबईमधील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा प्रसार किती प्रमाणात झाला याची माहिती मिळावी म्हणून सेरो सर्वेक्षण केले होते. पालिकेचा झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर उत्तर, एम पश्चिम आणि एफ उत्तर या ३ विभागांमध्ये हे नमुने संकलित करण्यात आले होते. जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात अंदाजित केलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले. त्यात झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के याप्रमाणे अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधला असता याला हर्ड इम्युनिटी बोलणे योग्य ठरणार नाही. कारण हा सर्व्हे पालिकेच्या २४ पैकी ३ विभागातील आहे. तीन विभागात केलेल्या सर्व्हेप्रमाणे सरासरी ४० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. हे प्रमाण ५० टक्केहून अधिक असले तर आपण त्याला हर्ड इम्युनिटी निर्माण झाली असे बोलू शकतो. हर्ड इम्युनिटी तयार झाली की, नाही हे पाहण्यासाठी पालिकेला आपल्या २४ विभागांत क्लस्टर सर्वेक्षण करावे लागेल. त्यामधून जे आकडे समोर येतील त्यावरून हर्ड इम्युनिटीबाबत नेमकी माहिती मिळू शकते. पालिकेने आता जो सर्व्हे केला आहे, त्यावरून आपण हर्ड इम्युनिटीच्या अगदी जवळ आहोत, हेच सिद्ध होते, असे मेडस्कॅप इंडिया व वी डॉक्टर्स कॅम्पेन फॉर कोव्हीडच्या संस्थापिका रेडिओलॉजिस्ट डॉ. सुनीता दुबे यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेने केलेल्या सर्व्हेनुसार हर्ड इम्युनिटीला सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, भारतात लहान बाळ असल्यापासून विविध लशी दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये त्या-त्या आजाराबाबत रोग प्रतिकारशक्ती वाढलेली असते. भारतातील आहार पद्धतीमुळेही रोग प्रतिकार शक्ती वाढलेली असल्याने मुंबईसह भारतात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला नाही, अशी माहिती पालिकेच्या रुग्णालयांचे प्रमुख व संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.