ETV Bharat / state

पडद्यामागील कामगारांना द्यावा आर्थिक मदतीचा हात; ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियनची मागणी

चित्रपटसृष्टीतील काम करणाऱ्या कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. महाराष्ट्रात 20 लाख कामगार हे चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. त्यांनादेखील आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियनने केली आहे.

need economic help to spot boy in film industry
पडद्यामागील कामगारांना द्यावा आर्थिक मदतीचा हात; ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियनची मागणी
author img

By

Published : Apr 25, 2021, 6:45 PM IST

मुंबई - राज्य सरकराने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पुन्हा पूर्व पदावर येत असलेल्या चित्रपटसृष्टीतील काम करणाऱ्या कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. हे कामगारदेखील असंघटीत आहेत. महाराष्ट्रात 20 लाख कामगार हे चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. त्यांनादेखील आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियनने केली आहे.

प्रतिक्रिया

आर्थिक पॅकेज जाहीर करावे -

कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला आमचा पाठींबा आहे. कामगारांसाठी पॅकेज जाहीर केला आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना हे सांगायचे आहे की, चित्रपट क्षेत्रातही असंघटीत कामगार आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव हा मराठी आणि हिंदीच्या चित्रपटसृष्टीवर झाला. राज्यात चित्रपटसृष्टीशी जोडलेले 20 लाख असंघटीत कामगार आहेत. स्पॉटबॉयपासून छोट्या कामगारांचा आणि तंत्रज्ञांचा यात समावेश आहे. रोजंदारीवर हे कामगार काम करत असतात. पहिला जेव्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, तेव्हा 50% शूटिंग बंद होते. आता आता शूटिंग काही प्रमाणात चालू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या कामगारांचे आर्थिक हाल होत आहे. अनेक जण ही छोट्या घरात राहतात. घरभाडे द्यायलासुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी असे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी केली आहे.

हेही वाचा - प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल…! बहीण प्रीतम मुंडेंसाठी भाऊ धनंजय मुंडेंचा काळजीयुक्त संदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.