ETV Bharat / state

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा मंत्रालयावर मोर्चा, आंदोलक महिला ताब्यात - NCP Women Agitation

राज्याचे कृषिमंत्री व शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याविरोधात मंत्रालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा ( NCP Women Agitation ) काढला. याप्रसंगी पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Abdul Sattar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा मंत्रालयावर मोर्चा
author img

By

Published : Nov 15, 2022, 7:47 PM IST

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री व शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्या आज आक्रमक झाल्या असून सत्तार यांच्याविरोधात मंत्रालयावर धडक मोर्चा ( NCP Women Agitation) काढला.

मोर्चातील महिला पोलिसांच्या ताब्यात - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा मंत्रालयावर धडकत असताना ठिकठिकाणी या मोर्चातील महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर काही मोजक्या राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयात घुसण्याचा जोरदार प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

आंदोलक महिलांना अटक ताब्यात घेण्यात आले आहे.

महिला कार्यकर्त्या राजीनाम्या घेण्यावर ठाम - आमच्यावर कितीही कारवाई केली तरी सुद्धा जोपर्यंत मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही याच पद्धतीने आक्रमकपणे याचा जोरदार निषेध करतच राहू, असे या मोर्चातील समाविष्ट झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.