ETV Bharat / state

शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी साजरा करणार 'बळीराजा कृतज्ञता दिन' - sharad pawar birthday as a Baliraja Krutadnyata Din

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'बळीराजा कृतज्ञता दिन' साजरा करणारा आहे.

NAWAB MALIK
नवाब मलिक
author img

By

Published : Dec 9, 2019, 7:21 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना १२ डिसेंबरला वयाची ८० वर्षे पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून साजरा करणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच माध्यमातून 'बळीराजा कृतज्ञता कोष' तयार करुन ८० लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक...

हेही वाचा... अजित पवार व फडणवीस साडे तीन दिवसांच्या सत्तास्थापनेनंतर पुन्हा एकत्र; पवार म्हणतात..

शरद पवार यांच्या वाढदिवशी जमा झालेला निधी 'राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट'कडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी मदत स्वरूपात दिला जाणार आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम वर्षभर होणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा... 'स्टेट बँके'चे गृहकर्जासह वाहनकर्ज स्वस्त; सलग आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात

१२ डिसेंबर २०१९ला सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शरद पवार हे लोकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. मात्र यावेळी ते पुष्पगुच्छ, पुष्पहार स्वीकारणार नाही. त्या ऐवजी तो निधी कृतज्ञता कोषात जमा करावा, असे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम देण्यात आला आहे. युवकांच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी 'विकास आणि परिवर्तनाचा महानेता' या विषयावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शिवाय संपुर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्यावतीने ११ ते २० डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान देखील हाती घेण्यात येणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा... सोलापूर बाजार समितीत दीड लाख क्विंटल कांद्याची विक्री; ५ दिवसात कोट्यवधीची उलाढाल

Intro:शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी साजरा करणार बळीराजा कृतज्ञता दिन

मोजोवर बातमी पाठवली आहे

Body:शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी साजरा करणार बळीराजा कृतज्ञता दिन

Conclusion:शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी साजरा करणार बळीराजा कृतज्ञता दिन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.