मुंबई - कॅबिनेट बैठकीत स्किल डेव्हलपमेंटबाबत चर्चा झाली. १८ महिन्यात विद्यापीठ सुरू करण्याचा सरकारचा निर्णय आहे. यासंदर्भात विधिमंडळामध्ये विधेयक मंजूर करून घेऊ, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
लस घेऊ नये, असे माझ्या नावाने आशिष शेलार आरोप करत आहेत. मी कुठेही म्हटले नाही की, लस घेऊ नका. माझी बहिण डॉक्टर आहे. तिने पहिला डोस घेतला. लसीबाबत लोकांच्या मनात शंका कु शंका आहेत. त्या दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घ्यावी, जेणेकरून लसीबाबत विश्वासाहर्ता वाढेल. सरकार चालवण्याचा तीन पक्षाला अनुभव आहे. भाजपच्या कुठेतरी नशिबाने सत्ता हातात आली हाती. ती त्यांना सांभाळत आली नाही. त्यांच्या मनगटात टाकत होती तर व्यवस्थित काम केले नाही. वीज बिल थकबाकी २० हजार कोटींवरून ७० हजार कोटींवर गेली.
चौकशी अहवाल आल्यावर कारवाई अपेक्षित
शेतकरी कर्जमाफी केलेली नाही. कोविड असताना राज्य सरकारने कर्जमाफी निर्णय योग्य घेतला. संकटे हातातळी, बावनकुळे आमदारकी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांच्याबाबतीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चौकशी अहवाल आल्यावर कारवाई अपेक्षित आहे. अहवाल येत नाही तोपर्यंत आरोप करणे योग्य नाही. चौकशीचे काम सुरू आहे, राठोड गायब झालेले नाहीत. नेत्यांच्या संपर्कात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, लोकांची बदनामी करण्याचा धंदा मीडियाकडून सुरू आहे.
राठोड यांना माझा सल्ला आहे, त्यांनी खुलासा करू नये. खुलासा करण्यात नवीन प्रश्न निर्माण होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. मी पूजाचा स्टेटस पाहिला. वडील, आई, राठोड यांचा फोटो आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अर्थ लावू नये.