ETV Bharat / state

NCP Silver Jubilee Anniversary : राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन, पक्षाची राष्ट्रीय कामगिरी ते राज्य पातळीवर घसरण... - राष्ट्रवादी राज्याच्या राजकारणातील किंगमेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन १० जूनला साजरा होत आहे. पक्षाने या २५ वर्षात अनेक चढ उतार पाहिले आहेत. पक्षाचे नेते शरद पवार यांनी समर्थपणे राष्ट्रवादीची धुरा वाहिली आहे. मात्र पक्षाचा राष्ट्रीय दर्जा नुकताच संपुष्टात आल्याने पक्ष पुन्हा कधी भारारी घेते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

af
adf
author img

By

Published : Jun 8, 2023, 10:51 PM IST

Updated : Jun 9, 2023, 7:24 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन १० तारखेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) ची स्थापना 10 जून 1999 रोजी करण्यात आली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 10 जून 2023 रोजी पक्ष 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत राष्ट्रवादीची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीची घेतलेला आढावा...

पक्ष स्थापनेपासूनचा राजकीय प्रवास - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय 25 मे 1999 रोजी तीन प्रमुख भारतीय नेत्यांनी घेतला. राष्ट्रीय काँग्रेसमधून सोनिया गांधींच्या इटालियन वंशाच्या मुद्यावरुन या तीन नेत्यांना काढून टाकण्यात आले होते. त्यामध्ये शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांचा समावेश होता. नंतर आपल्या हजारो समर्थकांसह दिल्लीमध्ये गुरुद्वारा रकाबगंज क्रमांक 6 येथे हे नेते जमले. त्यावेळी त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली हा दिवस देशात रेड लेटर डे म्हणून ओळखला गेला. शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पी.ए संगमा तसेच तारिक अन्वर यांना सरचिटणीस करण्यात आले. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतिहासातील पहिला पक्ष होता.

पक्ष विचारधारा : राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःचे वर्णन "आधुनिक आणि पुरोगामी अभिमुखता असलेला सहस्राब्दी पक्ष" असे केले आहे. या पक्षाची विचारसरणी "संपूर्ण लोकशाही", "गांधीवादी धर्मनिरपेक्षता" आणि "संघवादावर आधारित राष्ट्रीय एकात्मता" अशी आहे. त्यात "समानता आणि सामाजिक न्यायाशी जोडलेला लोकशाही धर्मनिरपेक्ष समाज" असे म्हटलेले आहे.

निवडणूक चिन्ह आणि त्याचे महत्त्व : राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हे एक अ‍ॅनालॉग घड्याळ आहे. या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे अशी वेळ दाखवण्यात आलेली आहे. घड्याळ निळ्या रंगात काढले आहे आणि दोन पाय आणि अलार्म बटण आहे. हे तिरंगी ध्वजावर घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वापरलेले हे चिन्ह सांकेतिक आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या तत्त्वांसाठी लढत राहील हे त्यातून दर्शवते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य माणसाच्या विचारांचे आणि चिंतांचे प्रतिनिधित्व करतो. हे भारतातील सामान्य नागरिकांच्या वतीने बोलण्याच्या आदर्शांचे प्रतीक असे हे चिन्ह असल्याचे मानण्यात येते.

राष्ट्रवादीचे राजकीय चढउतार : राष्ट्रवादीची स्थापना सोनियांच्या नेतृत्वाला विरोध असतानाही गांधी यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) मध्ये सामील झाला. एवढेच नाही तर ऑक्टोबर 1999 मध्ये महाराष्ट्राचे सरकार त्यांच्या सोबतीने स्थापन झाले. त्यानंतर 2004 मध्ये, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष यूपीएमध्ये सामील झाला. राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार यांनी सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दोन्ही पाच वर्षांच्या कार्यकाळात कृषी मंत्री म्हणून काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2014 पर्यंत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य सरकारचा भाग राहिला. 20 जून 2012 रोजी पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली. त्यात त्यांचा पराभव झाला. एप्रिल आणि मे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) यूपीएचा पराभव झाला आणि दहा वर्षात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडली. ऑक्टोबर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाशी असलेली युती तोडली आणि ते स्वबळावर लढले. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि सुरुवातीला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार स्थापन केले.

निवडणुकीचे राजकारण एप्रिल 2019 मध्ये महाराष्ट्रातून लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपाची व्यवस्था केली होती. तसेच त्यांच्यात मतभेद असूनही भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा एनडीएच्या बॅनरखाली एकत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने अनुक्रमे 23 आणि 18 जागा जिंकल्या. राज्याच्या एकूण 48 लोकसभेच्या जागांपैकी ही कामगिरी होती. राज्यात काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली. तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा जिंकल्या.

राष्ट्रवादी राज्याच्या राजकारणातील किंगमेकर : गेल्या साडेपाच दशकांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर शरद पवार या नावाचा दबदबा आहे. शरद पवार हे फार पूर्वीपासून राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत राज्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकांनंतर राष्ट्रवादीची सत्ता आली. पक्षाच्या 25 वर्षांच्या इतिहासात पक्ष केवळ ५ ते ६ वर्षे सत्तेबाहेर राहिला आहे. 2014 मध्ये मोदी लाटेच्या प्रभावामुळे राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडावे लागले. महाराष्ट्रासह देशात ही परिस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसलाही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र पालटले. 2019 मध्ये, भाजप-शिवसेना महायुतीचा रथ रोखणे कठीण असताना राष्ट्रवादीने चांगलीच बाजी मारली. साताऱ्यातील पावसात झालेल्या वादळी सभेने राष्ट्रवादीला नवी ऊर्जा दिली. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर राष्ट्रवादीने मोठी राजकीय खेळी केली. विविध विचारसरणी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जातात.

निवडणूक आयोगाने NCP चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केला रद्द : 10 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा केवळ प्रादेशिक पक्ष राहणार आहे. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा हिरावून घेतल्याने आता त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणाऱ्या सवलती आता मिळणार नाहीत. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची कामगिरी : राष्ट्रवादीकडे अनेक प्रमुख आघाडीच्या संघटना आहेत, जसे की राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादीची विद्यार्थी शाखा, शेती कामगार संघटना. राष्ट्रवादी किसान सभा नावाची संघटना, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस इत्यादी संघटना आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अतिशय सक्रिय राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या माध्यमातून देशातील महिलांच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांना कृषीरत्न पुरस्कार मिळाला आहे. भारतातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करणाऱ्या देशातील कृषीविषयक काही अत्यंत महत्त्वपूर्ण धोरणांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी अर्थसंकल्पात शेतीसाठीची तरतूद दरवर्षी 2% वरून 4.5% पर्यंत वाढवली होती. मृदा व्यवस्थापन, आरोग्य आणि सुपीकता, जूट तंत्रज्ञान अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि सर्वसाधारणपणे ग्रामीण विकास यासारख्या अनेक योजना उत्पादकता वाढवण्यासाठी सादर केल्या. पी ए संगमा यांनी 1996 ते 1998 या काळात लोकसभेचे अध्यक्ष म्हणून देशाच्या राजकीय विकासात मोठी भूमिका बजावली. त्यांनी लोकसभेत शिष्टाई राखली आणि ते कठोर सभापती होते. रेडक्रॉस सोसायटी आणि यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया यासारख्या अनेक संस्थांशी ते संबंधित होते. त्यांनी वंचित मुलांसाठी रात्रशाळाही सुरू केल्या आहेत. नागरी विमान वाहतूक उद्योगात पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वपूर्ण बदल केले. त्यांनी देशात अनेक नवीन जागतिक दर्जाचे विमानतळ सुरू केले आणि या क्षेत्रात अभूतपूर्व वाढ केली. देशांतर्गत उड्डाण संपर्क वाढविण्यात आला आहे आणि एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणे अधिक वारंवार करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देशाच्या विकासात भर घातली असली तरी आज या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा पक्ष कधी मोठी भरारी घेतो ते पाहावे लागेल.

Last Updated : Jun 9, 2023, 7:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.