ETV Bharat / state

चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चाने दणाणली मुंबई - chunabhatti rape case

जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणीवर मुंबईतील चेंबुर परिसरात 4 नराधमांनी विषारी ड्रग्ज देवून सामुहिक बलात्कार केला होता. 1 महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या तरूणीची मृत्यू सोबतची झुंज अखेर गुरूवारी संपली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी मुंबईमध्ये सरकारविरोधात चेंबूर ते चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला.

भव्य मोर्चा
author img

By

Published : Aug 31, 2019, 12:33 AM IST

मुंबई - राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातच जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणीवर मुंबईतील चेंबूर परिसरात 4 नराधमांनी विषारी ड्रग्ज देवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात 1 महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी रात्री औरंगाबाद येथे संपला. घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीने काढलेल्या भव्य मोर्चाने दणाणली मुंबई

चेंबूर परिसरातील लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलीस ठाण्यापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईमध्ये राष्ट्रवादीने काढलेल्या सरकार विरोधातील मोर्चामध्ये मुंबईकर सर्वसामान्य जनताही सहभागी झाली होती. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. 'होश मे आओ होशमे आओ फडणवीस सरकार होशमे आओ'. बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो...फाशी द्या फाशी द्या बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या...फडणवीस सरकार हाय हाय... अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसने मुंबई दणाणून सोडली

चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विद्या चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं झालं नाही तर यापेक्षा मोठया पध्दतीचे व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच जोपर्यंत त्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांशी चर्चा करुन आल्यावर माध्यमांशी बोलताना दिला आहे.

Intro:राष्ट्रवादीच्या चेंबूर ते चुंनाभट्टी भव्य मोर्चाने मुंबई दणाणली.

राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. यातच जालना जिल्हयातील 19 वर्षीय तरुणीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी रात्री औरंगाबाद येथे संपला. घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आलाBody:राष्ट्रवादीच्या चेंबूर ते चुंनाभट्टी भव्य मोर्चाने मुंबई दणाणली.

राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. यातच जालना जिल्हयातील 19 वर्षीय तरुणीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी रात्री औरंगाबाद येथे संपला. घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला

मोर्चाला सुरुवात चेंबुर परीसरातील लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईमध्ये राष्ट्रवादीने काढलेल्या सरकार विरोधातील मोर्चामध्ये मुंबईकर सर्वसामान्य जनताही सहभागी झाली होती.यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या

- होश मे आओ होशमे आओ फडणवीस सरकार होशमे आओ. बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो...फाशी द्या फाशी द्या बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या...फडणवीस सरकार हाय हाय... अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसने मुंबई दणाणून सोडली

चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं नाही झालं तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच जोपर्यंत त्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पोलिसांशी चर्चा करुन आल्यावर माध्यमांशी बोलताना दिला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.