ETV Bharat / state

NCP President Sharad Pawar : शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, अद्याप रुग्णालयात उपचार सुरू - Sharad Pawar still undergoing treatment

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अत्याव्यवस्थेच्या कारणामुळे मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले (Sharad Pawar still undergoing treatment) होते. 31 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २ नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी आशा होती. मात्र त्यांना अजून एक दिवस रुग्णालयात थांबावे लागणार असून आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती मिळत (Sharad Pawar likely discharged today) आहे.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Nov 3, 2022, 8:57 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अत्याव्यवस्थेच्या कारणामुळे मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले (Sharad Pawar still undergoing treatment) होते. 31 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २ नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी आशा होती. मात्र त्यांना अजून एक दिवस रुग्णालयात थांबावे लागणार असून आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती मिळत (Sharad Pawar likely discharged today) आहे.

तीन दिवस उपचार : शरद पवार यांना 31 तारखेला रुग्णालयात उपचाराखातर दाखल करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक पत्रक जाहीर करून शरद पवार हे रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतील. त्यानंतर २ नोहेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळेल अस या पत्रातून सांगण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी शरद पवार यांना अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेला (Sharad Pawar in hospital) नाही.

धनंजय मुंडे आणि रोहित पवारांची भेट : शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्याशी गप्पाही मारल्या. यावेळी भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ही त्यांनी (Sharad Pawar likely discharged) दिली.

शिर्डीच्या शिबिरात शरद पवार राहणार उपस्थित : चार आणि पाच नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर शिर्डीत पार पडणार आहे. या शिबिराला अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयात शरद पवार उपचार घेत असले तरी आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी शरद पवार यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला तरच ते शिबिराला उपस्थित राहू शकतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.