ETV Bharat / state

NCP Political Crisis : ...त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड (NCP Political Crisis) केल्यानंतर वेगवेगळे गौप्यस्फोट केले जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत नवीन गौप्यस्फोट केला आहे. शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीला असताना राष्ट्रवादीचे 51 आमदार भाजपसोबत (Maharashtra Political Crisis) जाणार होते, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 4, 2023, 12:26 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Political Crisis) अजित पवार यांनी भाजपासोबत हात मिळवत उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. राजकारणात यामुळे खळबल उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून निर्णय घेतल्याचा आरोप अजित पवारांवर होत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शिंदे गट गुवाहाटीला असताना (Maharashtra Political Crisis) राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना केला आहे.

शरद पवार चर्चेत उपस्थित नव्हते - भाजपसो जाण्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना प्रफुल पटेल यांनी माहिती दिली की. शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडलं. त्या कालावधीत भाजपसोबत जाण्याच्या हेतूने राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 51 आमदारांनी शरद पवार यांना पत्र देत भाजपासोबत जाण्याचा आग्रह केला होता. शरद पवार यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. भाजपासोबत जाण्यासंदर्भात गेल्या वर्षभरामध्ये पक्षात चर्चा झाल्या होत्या. या सर्व चर्चेत शरद पवार उपस्थित नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

एकत्र निवडणूक लढणार - येणाऱ्या लोकसभा निवडणुका या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत. तर विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे महाविकास आघाडी आता कमकुवत झाली आहे. राज्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष बहुमताने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना - राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेस काय भूमिका घेतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.

गौप्यस्फोटानंतर चर्चांना उधाण - प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे 51 आमदार भाजपसोबत जाणार होते, असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावेळी या प्रकाराकडे शरद पवार यांनी लक्ष दिले नसल्याचेही पटेल म्हणाले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : अजित पवारांच्या सहभागानंतर पहिलीच मंत्रीमंडळाची बैठक, कट्टर विरोधक बसणार सोबत
  2. Maharashtra Political Crisis: शिवसेनेत बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रततेचा लवकर निर्णय घ्या- ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
  3. NCP Political Crisis: राष्ट्रवादी विरोधी पक्षात की सरकारमध्ये हे अजून स्पष्ट नाही- राहुल नार्वेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.