ETV Bharat / state

टेन्शन वाढलं! पुतण्याकडं राष्ट्रवादी जाण्यापासून वाचविण्याकरिता शरद पवारांसमोर कोणती आहेत आव्हानं? - जयंत पाटील

NCP Sharad Pawar Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी खरी कोणाची याकडे सर्वांच लक्ष लागलंय. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 9:53 AM IST

आनंद गायकवाड

मुंबई NCP Sharad Pawar Ajit Pawar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रेचा महत्त्वाचा निर्णय देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच ही खरी शिवसेना असल्याचं म्हटलंय. शिवसेनेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि तांत्रिक बाजूंचा विचार करता कोणाकडे जाऊ शकतो? यावर आता राजकीय अंदाज लावले जात आहेत. जाणून घेऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि तांत्रिक बाजू काय आहेत?

काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसची घटना : 8 जुलै 2022 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या घटनेत पक्ष धोरण, शिस्तभंग कारवाई, सभासदत्व कायम करण्याबाबतच्या नियम, अटी शर्ती यांचा समावेश यात करण्यात आलाय. संविधानाच्या कक्षेत अधीन राहून धर्मनिरपेक्ष विचारधारा जोपासणं आणि प्रसार करणं, त्यासोबतच भारताची एकता आणि अखंडता राखणं याचाही घटनेत समावेश करण्यात आलाय.

वर्किंग कमिटीला महत्त्वाचे अधिकार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय ते गावपातळीवरील समित्यांनी तयार झालाय. नॅशनल कमिटी, वर्किंग कमिटी, स्टेट कमिटी, यूनियन टेरिटरी कमिटी, रिजनल कमिटी आणि डिस्ट्रीक्ट कमिटी मिळून पक्ष तयार झालाय. या समितीतील अध्यक्षांना घटनेनुसार कमिटी बनवण्याचा अधिकार दिलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्किंग कमिटीला पक्षाचे सर्वोच्च कार्यकारी अधिकार दिले आहेत. पक्ष आणि नॅशनल कमिटीच्या वतीनं बनविलेले धोरणात्मक कार्यक्रम राबवण्याचा अधिकार त्या कमिटीला दिलाय. वर्किंग कमिटीत पक्ष अध्यक्ष, संसदेतील पक्ष नेते तसंच 23 सदस्य असतात. 23 मधील 12 सदस्यांची नॅशनल कमिटीच्या माध्यमातून नेमणूक केली जाते. तर राहिलेल्यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष करतात. घटने संदर्भातील अर्थ लावणे आणि घटनेचा अवलंब करण्याच्या पावले उचलण्याचा अंतिम अधिकार वर्किंग कमिटीला देण्यात आले आहेत.

कार्यकारी अध्यक्षांकडं महत्त्वाची जबाबदारी- पक्षातील इतर समित्या किंवा एखाद्या व्यक्तीविरोधात शिस्त पालन न केल्यानं कारवाई करण्याचा अधिकार वर्किंग कमिटीला असणार आहे. यासाठी एक राष्ट्रीय शिस्त पालन समिती तयार करेल. हकालपट्टीबाबत घटनेत सविस्तर माहिती देण्यात आलीय. पक्षविलीनीकरण किंवा विसर्जन करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय कार्यकारिणीला खास बैठक घेऊन निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी सदरची बैठक ही पक्ष अध्यक्ष आणि पक्षाच्या जनरल सेक्रेटरी यांनी बोलावली पाहिजे. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद निर्माण तयार करून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आलंय.

व्हीपच बदलवला नाही - छगन भुजबळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी सुरू असताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी व्हीपबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. या संदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीचा जो व्हीप आहे, तोच आमचा व्हिप आहे. त्यामुळं आमच्या पक्षाची बाजू मजबूत असून आम्ही व्हिप बदलला नाही. त्यामुळं शिवसेना प्रकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरण यात फार मोठा फरक आहे. निकालाच्या दरम्यान व्हीपच्या आजूबाजूला सर्व गोष्टी केंद्रित होत होत्या. मात्र, या ठिकाणी हा भागच नसल्यामुळं आमची बाजू भक्कम आहे."

आमची मेरिटची बाजू : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कोणाची हा निर्णयही लवकरच येणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून बाजू मांडल्या जाणार आहेत. या प्रकरणात बेसिस वेगळा असून मनात कुठल्याही प्रकारची धाकधूक नसल्याचं राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आमची मेरिटची बाजू असून ती आम्ही योग्य प्रकारे अध्यक्षांसमोर मांडणार आहोत. विधानसभा अध्यक्ष परिस्थितीनुसार निर्णय घेतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.

शरद पवार यांच्यापुढं कोणती आव्हानं : शिवसेना कोणाची याचं उत्तर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालादरम्यान सांगितलंय. महायुतीतील दुसरा पक्ष असलेला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकाला विषयीदेखील अशाच प्रकारची उत्सुकता निर्माण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला जर दिलं तर शरद पवारांना पुढे कमी दिवसात नवीन मिळणारं पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव लोकांपर्यंत पोहोचवणं, हे मोठ आव्हान असणार आहे. यापूर्वी पक्ष आणि चिन्ह याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अवघड होती. मात्र, डिजिटल माध्यमाद्वारे पक्ष नाव आणि चिन्ह आता तळागाळापर्यंत पोहोचवणं शक्य झालंय. डिजिटल माध्यमाद्वारे तुम्ही क्षणात लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होते.

मुद्दे जनतेपर्यंत पोहोचविणं महत्त्वाचं असणार- 18 ते 35 वयोगटातील 55 टक्के मतदार आहेत. आपल्याकडे सरासरी 50 ते 60 टक्के मतदान होत असते. या नवीन आणि तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान डिजिटल माध्यमांमुळे कमी होणार असल्याचा विश्वास राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणूक तयारीसाठी कालावधी कमी राहिला आहे. सर्वात आधी पक्ष चिन्ह आणि नाव मिळवणं, त्यानंतर चांगले उमेदवार देणं, पक्षाची भूमिका आणि मुद्दे जनतेपर्यंत पोहोचविणं ही महत्त्वाचे आव्हाने शरद पवार यांच्यापुढं असणार आहेत.

हेही वाचा :

  1. अजित पवार आणि शरद पवार वाद; पुतण्यानं पुन्हा काकांपुढं येणं टाळलं, बैठकीला मारली दांडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.