ETV Bharat / state

Monsoon Session 2023: राष्ट्रवादीत दोन्ही गटाकडून व्हिप जारी केल्याने आमदारांमध्ये संभ्रम; विधीमंडळातही विधानसभा अध्यक्षांसमोर असणार 'हा' पेच - अजित पवार गट

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राजकीय उलथापालथीचे पडसाद विधीमंडळात दिसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सर्व आमदारांना अधिवेशनात उपस्थित राहण्याबद्दल पक्षादेश (व्हीप) काढण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील वाद पुन्हा चिघळणार आहे.

assembly Monsoon session 2023
विधानसभा पावसाळी अधिवेशन 2023
author img

By

Published : Jul 16, 2023, 10:51 AM IST

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पक्षादेशावरून दोन्ही गट आमने सामने आले आहेत. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी पक्षादेश बजावला असताना, शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनीही सर्व आमदारांना पक्षादेश काढला आहे. शरद पवार यांच्याकडे किती आमदारांचे संख्याबळ आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सर्व आमदारांना पक्षादेश : दोन आठवड्यांचे हे अधिवेशन असून सर्व आमदारांनी या काळात उपस्थित राहावे, यासाठी पक्षादेश बजावला जातो. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन पक्षादेश आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाकडून सर्व आमदारांना पक्षादेश काढले आहेत. अजित पवार गटाने 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. उर्वरित आमदार शरद पवार गटाकडे आहेत. शरद पवार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना पक्षादेश जारी केला आहे. तसेच, मंत्रिमंडळात सामील झालेल्या आमदारांना शरद पवार यांनी नोटीस दिली आहे. या सर्व घडामोडींनंतर ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या अद्याप ग्राह्य धरलेले नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वीच दोन्ही गट आमने सामने येण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पुर्वी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्याची तातडीची बैठक घेण्यात येणार असून सुनील तटकरे या बैठकीला कार्यालयात मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकमेकांना भिडणार : शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून उचलबांगडी करत अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्याकडे कारभार राहिला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे गटनेते आणि प्रतोद यांची नेमणूक रद्द ठरवली. भरत गोगावले यांना यावेळी प्रतोद करण्यात आले. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीने ही आपले दोन्ही गटाचे प्रतोद निवडले आहेत. विधानसभेप्रमाणे विधान परिषदेतही राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना भिडणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे असणार पेच- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै 2023 ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे कामकाजाचे 15 दिवस असणार आहेत. दोन्हीकडून आलेल्या पक्षादेशामुळे आमदार संभ्रमात आहेत. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरही दोन्ही पक्षादेशामुळे पेच निर्माण झाला आहे. विधिमंडळात यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. ​​NCP Political Crisis: अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांचे एक पाऊल पुढे, निवडणूक आयोगात 'ही' याचिका दाखल
  2. Sharad Pawar supporter : 'त्या' आमदारांच्या मतदार संघातील 80 टक्के कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी - महेश तपासे
  3. Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवार श्रद्धास्थान, प्रेरणास्थान; त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात - अजित पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.