ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis Update: नाशिकच्या येवल्यात शरद पवार यांची सभा सुरू - छगन भुजबळ येवला मतदारसंघ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी येवला बाजार समितीच्या पटांगणात सभा घेणार आहेत. सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भविष्याबाबत चिंता वाटत असल्याचे सांगत शरद पवार यांनी गर्भित इशारा दिला होता. त्यामुळे भुजबळ यांचा भविष्यात येवल्यात पराभव करण्यासाठी शरद पवार गटाकडून रणनीती आखण्यात येत असल्याचे दिसत आहे.

Sharad Pawar Nashik meeting
शरद पवार नाशिक दौरा
author img

By

Published : Jul 8, 2023, 9:56 AM IST

Updated : Jul 8, 2023, 5:12 PM IST

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात झंझावाती दौरा करणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणवणाऱ्या छगन भुजबळ यांनी बंडानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांची बाजू घेत शरद पवारांवर जोरदार टीका केली. कोणताही राजकीय हिशेब पूर्ण करण्याचा लौकिक जपणाऱ्या शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला येवला मतदार संघात सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याची सोशल मीडियावर अफवा पसरली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांचा नाशिक दौरा नियोजित असून भुजबळांच्या मतदार संघात सभा होणार असल्याचे स्पष्ट केले.

Live Update:

  • शरद पवार यांची सभा येवल्यात सुरू झाली आहे. व्यासपीठावर पवारांसह खा. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि इतर स्थानिक नेते आहेत.
  • गडचिरोलीमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत.
  • सभेपूर्वी शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत आहेत. शरद पवार म्हणाले, वस्तुस्थिती मांडण्यासाठी दौरा करणार आहे. राज्याबाहेर तीन ठिकाणी दौरे करणार आहे. नाशिकमध्ये येत असताना वरुणराजाने स्वागत केले आहे.

विकासासाठी राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी काही म्हटले याकडे लक्ष द्यायची गरज नाही. मोदींच्या नेतृत्तवात देश पुढे जात आहे. विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. गडचिरोलीत रेल्वेची कामे सुरू आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीतील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अजित पवार जुने मित्र, मात्र नवीन साथी असल्याचे फडवणीस यांनी यावेळी म्हटले आहे.

शरद पवारांच्या मार्गावर छगन भुजबळ- शरद पवार यांच्या स्वागतानंतर त्याच ठिकाणी होणार छगन भुजबळ यांचे स्वागत होणार आहे. आनंद नगर चेक नाका या ठिकाणी थोड्याच वेळात छगन भुजबळ पोहोचणार आहेत. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना ठाण्याच्या वेशीवर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. अजित पवार समर्थक आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या समर्थकांकडून छगन भुजबळ यांचे जंगी स्वागत करून शरद पवार गटाला आव्हान देण्यात येणार आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - शरद पवार नाशिकमध्ये पोहोचले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे जंगी स्वागत केले आहे. नाशिकमध्ये शरद पवारांचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. खास तयार केलेला १५० किलोचा हार शरद पवार यांना घालण्यात आला आहे. पक्षाचे संघटन पुन्हा मजबूत करण्यासाठी मैदानात उतरल्याने स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. येवल्यातील सभेत शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादीने सभेपूर्वी टीझर रिलीज केला आहे.

अजित पवार गटात अस्वस्थता- राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन होत असतानाच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे मीम् पाहायला मिळत होते. ठाकरे गटाचे नेते विरुद्ध शिंदे गट यांच्यात ट्विटर वार रंग याचे चित्र होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना लक्ष्य केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्ह आमचाच असल्याचा दावा केला जाता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेऊन.अजित पवार गटाविरोधात शंख फुंकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या मतदारसंघात शरद पवार येत्या काळात सभा घेणार आहेत. यामुळे अजित पवार गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे.

  • शरद पवार यांची येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये सभा होणार असून त्याकरता शरद पवार यांच्या स्वागतासाठी दीडशे किलोचा हार तयार करण्यात आला आहे. हा हार तयार करण्यासाठी कारागिरांना 24 तासांचा कालावधी लागला आहे. हा हार शरद पवार आल्यानंतर सभास्थळी त्यांना घालण्यात येणार आहे.
  • अजित पवारांच्या बंडामागे भुजबळांची मोठी भूमिका लक्षात घेता राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्षफुटीनंतरची पहिली सभा आज येवल्यामध्ये होणार आहे. शरद पवार हे बंडखोरांविरोधात दंड थोपटणार आहेत. दरम्यान भुजबळही शक्तिप्रदर्शनासाठी शनिवारी नाशिकमध्ये रॅली काढण्यात येणार आहेत. यामुळे एकाच दिवशी दोन्ही नेते समर्थकांसह आपली ताकद दाखवणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
  • शिवसेनेच्या ( शिंदे गट) ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठविली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणण मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची याचिका दाखल केली आहे.
  • पवारांचे माझ्यावर प्रेम म्हणून ते येवल्यात सभा घेत आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच नाशिकमध्ये आले आहेत. संजय राऊत यांनी आधी कुठून तरी निवडून येऊन दाखवावे, मग आव्हान द्यावे, असा टोला छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. खातेवाटपाबाबत गडबड नाही. चर्चा करून निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
  • सकाळी येवला येथे सभेला जाण्यासाठी शरद पवार निघाले असताना त्यांचे ठाण्यात जंगी स्वागत करण्यात आले. हजारो कार्यकर्ते आनंद नगर नाक्यावर उपस्थित राहिले. त्यांची जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असताना अजित पवार यांनी ठाण्याचा नेत्यावर भाषणात टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर नेत्यांना, मी राजकारण सोडतो. तुम्ही पुन्हा पवार सांहेबांसाठी परत या, अशी भावनिक साद घातली.

बंडखोर नेत्यांची हकालपट्टी- पक्ष फुटला नाही आणि अजित पवार यांची 30 जून रोजी विधिमंडळ आणि संघटनात्मक शाखांनी एकमताने पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. असे असले तरी शरद पवार यांनी जनतेत जाऊन भूमिका मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत बंडखोर केलेल्या राष्ट्रवादीच्या ९ वरिष्ठ नेत्यांना पक्षातून काढले आहे.

काय आहे अजित पवार गटाचा दावा-

  • अजित पवार यांनी 40 हून अधिक आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांसह एक याचिका भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) सादर केली आहे. यात पक्षाचे अध्यक्षपद अजित पवार यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे आहे.
  • पक्षाची संघटनात्मक रचना पूर्णपणे सदोष होती. त्यामुळे जयंत पवार यांची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवारांवर टीका- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राज्यातील शिवसेना-भाजप सरकारमधील प्रवेशामुळे शिंदे गटाला कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, की कष्टकरी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले की पक्ष फुटतात. अजित पवार यांनी स्वतःच सांगितले आहे की शरद पवार यांनाच यापूर्वी 2017 व 2019 मध्ये भाजपसोबत युती करायची होती. पण त्यांनी अचानक यू-टर्न घेतल. खुद्द शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (1978 मध्ये) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (1999 मध्ये) यांच्याविरुद्ध बंड केले होते, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्रीपदी बदली होणार असल्याच्या अफवा निराधार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-

  1. Sharad Pawar Nashik Rally : शरद पवारांचा एल्गार, आज येवल्यात छगन भुजबळांविरोधात रान पेटवणार
  2. Sharad Pawar Rally In Nashik : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार शरद पवारांची तोफ, दौरा रद्द झाल्याची अफवा
  3. Political crisis in NCP : येवल्यात अन्याय झालेल्यांना शरद पवार आशीर्वाद देणार, आमदार रोहित पवार यांची छगन भुजबळांवर टीका

Last Updated : Jul 8, 2023, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.