ETV Bharat / state

NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह बंडखोर आमदारांची शरद पवारांसोबत चर्चा - महाराष्ट्र सत्तासंघर्ष

राष्ट्रवादीतील बंडानंतर राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या सर्व बंडखोर आमदारांसह नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. जवळपास एक तास या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

AJit Pawar Group MLAS Meet Sharad Pawar
अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली
author img

By

Published : Jul 17, 2023, 2:27 PM IST

Updated : Jul 17, 2023, 4:15 PM IST

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राष्ट्रवादीच्या काही बंडखोर नेत्यांनी रविवारी शरद पवारांची अचानक भेट घेतली होती. यानंतर आज अजित पवार गटाचे सगळे आमदार आणि नेते यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. वायबी चव्हाण सेंटर येथे ही भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • Maharashtra Deputy CM Ajit Pawar and NCP MLAs of his faction reach Mumbai's YB Chavan Centre to meet the party's president Sharad Pawar for the second consecutive day. Sharad Pawar will reach YB Chavan Centre shortly.

    (File photo) pic.twitter.com/Z6FDuWJ8M0

    — ANI (@ANI) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शरद पवारांची अचानक भेट - रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांची अचानक वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. वेळ न मागताच अचानक सर्व नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबद दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तर आम्ही शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो असल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.

मंत्र्यांची शरद पवारांसोबत चर्चा - राष्ट्रवादीच्या बंड केलेल्या 9 मंत्र्यांनी रविवारी शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील हजर होते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे हे नेते या बैठकीला उपस्थित होते.

चर्चा करुन निर्णय घेणार - रविवारी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी या सर्व मंत्र्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंती या सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अद्याप शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या सर्व विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत. तसेच या चर्चेनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही जयंत पाटील यावेळी म्हणाले होते.

पक्ष एकसंघ राण्यासाठी विनंती - आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. शरद पवार बैठकीसाठी येथे आले असल्याचे आम्हाला समजल्यावर आम्ही भेटीची वेळ न मागता त्यांच्या भेटीकरता आलो होतो. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे. मात्र, यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर दिली होती.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political crisis : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चा काय झाली?
  2. MLA Support Ajit Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी 'या' आमदाराचा पाठिंबा
  3. Vasant More On Ajit Pawar : मनसे नेते वसंत मोरेंनी केले उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत 'मोठे' विधान

Last Updated : Jul 17, 2023, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.