ETV Bharat / state

NCP Mumbai President : अजित पवार गटाचा मुंबईचा कारभार समीर भुजबळांकडं?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 11:23 AM IST

Updated : Sep 27, 2023, 11:58 AM IST

NCP Mumbai President : राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर दोन्ही गट संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहेत. त्याच अनुषंगानं अजित पवार गट देखील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करत आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची अजित पवार गटाच्या मुंबई शहराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : NCP Mumbai President : राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गटानं पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि सेलच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. मात्र, मुंबई शहरची जबाबदारी आतापर्यंत कोणावरही देण्यात आलेली नाही. माजी मंत्री नवाब मलिक हे आपल्यासोबत असल्याचा दावा वारंवार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून केला जात आहे.

नवाब मलिकांचं नाव होतं चर्चेत : राष्ट्रवादीच्या मुंबई शहराध्यक्षपदी असताना नवाब मलिक यांचा कार्यकाळ चांगला चर्चेत राहिला होता. त्यामुळं त्यांच्या नावाची वर्णी अजित पवार गटाकडून अपेक्षित असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मलिकांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास न्यायालयानं बंदी घातल्यामुळं नवाब मलिक यांचं नाव मागं पडलं आहे. शिवाजीराव नलावडे यांच्या नावालाही पक्षातून अनेक जणांनी विरोध दर्शवल्यामुळं समीर भुजबळ यांचं नाव पुढं आल्याचे समजत आहे. यावर बुधवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत समीर भुजबळ : समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आणि अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. तर पंकज भुजबळ यांचे चुलत भाऊ आहेत. समीर भुजबळ यांचा जन्म नाशिकमध्ये 9 ऑक्टोबर 1973 साली झाला. समीर भुजबळ यांनी आपलं शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांच्यासोबत कायम आपल्याला पाहायला मिळाले. समीर भुजबळ हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर नाशिक मतदारसंघातून 2009 साली खासदार म्हणून निवडून आले होते.

छगन भुजबळांकडून कौतुक : छगन भुजबळ आणि समीर भुजबळ राष्ट्रवादीच्या कायमच केंद्रस्थानी राहिले आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाचा पहिला मेळावा झाला होता. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांचं कौतुक केलं होतं. तेव्हापासूनच समीर भुजबळांवर अजित पवार गटाची मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत होते.

हेही वाचा -

  1. NCP President Row : राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण? अजित पवार म्हणाले, निवडणूक आयोगानं...
  2. Rohit Pawar News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अंदाज आहे, पण न्यायालयावर विश्वास - रोहित पवार
  3. Jayant Patil On Ajit Pawar: अजित पवारांबाबत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं समाधान, म्हणाले...

Last Updated : Sep 27, 2023, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.