ETV Bharat / state

Supriya Sule : पंतप्रधान मोदींच्या 'त्या' टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, घराणेशाही...

भारत हा २०४७ मध्ये विकसित देश होईल, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावरुन केले होते. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही यावरुन मोदींनी विरोधकांना टोला लगावला. याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. घराणेशाही सगळ्याच पक्षात असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या.

Supriya Sule News
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Aug 15, 2023, 8:29 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मंगळवारी प्रथमच 'स्वातंत्र्य दिन' दोन्ही गटाच्या मुख्य कार्यालयासमोर ध्वजारोहण करुन साजरा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या संबोधनात घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लगावला होता. याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सगळ्या पक्षात घराणेशाही : लाल किल्ला येथे केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहेच. मी संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे भाषण ऐकले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की, जर एक बोट दुसऱ्याकडे दाखवले तर तीन बोटे आपल्याकडे असतात. भाजपात देखील घराण्यातील लोकं निवडून आलेले आहेत. दुसऱ्या पक्षात असलेल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र, ते नेते आज भाजपात आहेत. भाजपामध्ये याबाबत स्पष्टता नाही.

भ्रष्टाचार, घराणेशाही आणि द्वेषभावना याविषयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. त्यामुळे भाजापातही घराणेशाही चालत आहे. त्यामुळे ही घराणेशाही सर्वच पक्षात आहे - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी

शरद पवारांनी संभ्रम दूर केला : दररोज नवीन संभ्रम आणि बातम्या येत आहेत. शरद पवार यांची सांगोल्यातील सभा आणि त्यानंतरची पत्रकार परिषद पाहिली तर सध्या निर्माण झालेला संभ्रम पूर्णपणे दूर होईल. आपल्याला कुणाशी वैयक्तीक लढायचे नाही. आपली वैचारिक लढाई आहे. समोरच्या लोकांच्या मनात संभ्रम असल्यामुळेच अधिक संभ्रम निर्माण होत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही - 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सरकारविरोधात पूर्ण ताकदीनिशी सामोरे जायचे आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 'इंडिया'ला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार देखील नाही. जेव्हा केव्हा हिमालय अडचणीत आला, त्यावेळी मदतीला सह्याद्री धावून गेला, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नात्यातील ओलावा आणि राजकीय धोरण वेगळे आहे. आमच्यामध्ये कुठलाही गैरसमज नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँगेस आणि शिवसेनेशी मी स्वतः बोलले. त्याची चिंता कोणी करू नका, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बी प्लॅनविषयी माहिती नाही : एका बाजूला शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गुप्त बैठकीमुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात नाराची पाहायला मिळत आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगळा निर्णय घेण्यासंदर्भात प्लॅन बी तयार करत असल्याच्या चर्चा आहेत. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यापर्यंत असा कोणताही विषय आला नाही.

हेही वाचा -

  1. Amit Shah : शरद पवारांचा उल्लेख करून अमित शाहांचा सुप्रिया सुळेंना टोला, म्हणाले..
  2. No Confidence Motion : सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक; मणिपूर, शेतकरी मुद्द्यांवरुन सरकारला धरले धारेवर
  3. Sharad Pawar reaction on Manipur Viral Video : केंद्र सरकारने मणिपूरमध्ये लवकर शांतता प्रस्थापित करावी - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.