ETV Bharat / state

Supriya Sule News : अजितदादाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझी इच्छा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिन कार्यक्रम मुंबईत पार पडला. यात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक इच्छा बोलून दाखवली होती. अजित पवार म्हणाले होते की, मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या. त्या पदाला न्याय द्यायचे काम करेन. त्यावर आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule News
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jun 22, 2023, 10:05 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल, आनंद व्यक्त केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगला संदेश जाईल, असे पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या. तसेच अधिकाधिक नेते पक्षात सहभागी होऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देतील. असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सर्व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात : पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी पक्ष संघटनेत काम केले आहे. अजित दादांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा मला आनंद आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते, या अटकळीबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सेवा, सन्मान आणि स्वाभिमान हे राष्ट्रवादीचे आदर्श आहेत. एक बहीण म्हणून आपल्या भावाच्या (अजित पवार) सर्व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे.

महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली : विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हा आणि पक्ष संघटनेतील कोणतीही भूमिका त्यांना सोपवा, असे आवाहन अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला केले. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्यांचे काका शरद पवार आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित असताना त्यांनी ही मागणी केली. अजित पवार यांनी गेल्या जुलैमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे.

हेही वाचा -

  1. Supriya Sule Reaction पक्ष संघटनेत अजित पवारांना काम करण्याची इच्छा सुप्रिया सुळे म्हणाल्या
  2. Sharad Pawar Threat Case: शरद पवार यांना मारण्याची धमकी देणारा निघाला सॉफ्टवेअर इंजिनिअर; मुंबई गुन्हे शाखेने केली अटक
  3. Supriya Sule : 'महाराष्ट्र न कभी झुका हैं, न कभी झुकेगा', सुप्रिया सुळे गरजल्या ; म्हणाल्या, 'दडपशाही विरोधात..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.