मुंबई: 'ई-मॅगेझिन'ने एप्रिल महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. देशातील खासदारांच्या सभागृहातील कामगिराचा आढावा हे मॅगेझिन घेत असते. आलेल्या अहवालात सुप्रिया सुळे वरचढ ठरल्या.
सर्वोत्कृष्ट खासदाराचे निकष काय? १७ व्या लोकसभेचा अहवाल. देशभरातील खासदारांनी 2019 पासून आतापर्यंत संसदेतील किती चर्चासत्रात भाग घेतला, किती खासगी विधेयके मांडली, प्रश्न किती विचारले तसेच सभागृहात उपस्थिती किती होती? या सर्व गोष्टींची अभ्यासपूर्ण पाहणी केली गेली होती.
सुप्रिया सुळे अव्वल: खासदार सुप्रिया सुळे यांची अभ्यासपूर्ण मांडणी, नेमकेपणा यासह आतापर्यंत त्यांनी एकूण 229 चर्चासत्रात सहभाग घेतला. संसदेत 546 प्रश्न विचारले. त्यासोबत 13 खासगी विधेयके मांडली. सर्व कामगिरीचा विचार करत 711 गुण मिळवत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रथमच पटलावर आणत त्यावर कायदा व्हावा, अशा सूचनाही खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडल्या.
खासदार उपस्थित टक्केवारी: खासदारांच्या उपस्थितीच्या टक्केवारीचे निकष राष्ट्रीय पातळीवर 79 टक्के तर राज्यपातळीवर 74 टक्के असते. सुप्रिया सुळे यांनी इथे देखील 93 टक्के गुण मिळवून अव्वल राहिल्या. संसदेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सरासरी राष्ट्रीय पातळीवर 176 तर राज्य पातळीवर 327 असल्याचे 'ई-मॅगेझिन'ने आपल्या अहवालात लिहिले आहे.
या बाबींमुळे ठरल्या अव्वल : विषयाची मुद्देसूद मांडणी, त्याचा सखोल अभ्यास, नेमकेपणाने बोलणे, संसदेचा पुरेपूर मान राखत योग्य तेच बोलणे, जास्तीत जास्त उपस्थिती, चर्चासत्रात सहभागी होणे इतकेच नाही तर एखाद्या लोकोपयोगी विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून तो खासगी विधेयकाच्या रूपाने पटलावर मांडण्यात खासदार सुप्रिया सुळे यांचा हातखंडा आहे. यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला.
सुळेंचा राज्य सरकारवर निशाना : खासदार सुप्रिया सुळे पवार म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाचा आमदार मंत्री जर दगड मारण्याची भाषा करत असतील, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. याबद्दल देवेंद्र फडवणीस यांच्याकडून गृहमंत्री म्हणून सुद्धा मला जास्त अपेक्षा नाही. परंतु महाराष्ट्राची कायदा व्यवस्था किती बिघडली आहे, हे याचे उदाहरण असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांना संसदेमध्ये भेटेल. याची चर्चा करणार आहे. कारण देवेंद्र फडवणीस यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्याची मला गरज सध्या वाटत नाही. परंतु मी त्यांनाही एक वेळ बोलेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा: Sharad Pawar Resignation : '..म्हणून मी राजीनामा मागे घेतला', अखेर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण