ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाही, तर पुतणे अवधूत शिवसेनेच्या वाटेवर - शिवसेना

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि खासदार सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता सुनील तटकरे नाही तर त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवधूत तटकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाही, तर पुतणे अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर
author img

By

Published : Aug 29, 2019, 10:03 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि खासदार सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता सुनील तटकरे नाही तर त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवधूत तटकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

ही सदिच्छा भेट असल्याचे अवधूत तटकरे यांनी सांगितले असले तरी लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. खासदार सुनील तटकरे आणि पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यात वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे यांच्या ऐवजी सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्यामुळे तटकरे बंधूंमध्ये वाद उफाळून आला होता.

तसेच, श्रीवर्धनमधून अवधूत यांच्याऐवजी रायगडाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांना संधी देण्यात येत असल्याचे कळताच अवधूत यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न सुरू केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत अवधूत तटकरे यांनी शिवसेनेचे रवी मुंडे यांचा अवघ्या ७३ मतांनी पराभव केला होता

Intro:राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाही , तर पुतणे अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर , उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मुंबई २९

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि खासदार सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते . मात्र आता चित्र स्पष्ट झाले असून सुनील तटकरे यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे . अवधूत तटकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली .

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे अवधूत तटकरे यांनी सांगितलं असले तरी लवकरच अवधूत टाकणारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे . खासदार सुनील तटकरे आणि पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यात वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात येत आहे . रायगडाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे यांना अवधूत तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघातून निवडूक लढवण्याची सध्या तयारी सुरु आहे . त्यामुळे यावेळी उमेदवारी मिळणार नसल्याने अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे .

खासदार सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे यांच्या ऐवजी सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली . त्यामुळे तटकरे बंधूंमध्ये वाद उफाळून आला होता . तसेच श्रीवर्धन मधून अवधूत यांच्या ऐवजी अदिती तटकरे यांना संधी देण्यात येत असल्याचे पाहताच अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न सुरु केला होता . गेल्या विधानसभा निवडणुकीत अवधूत तटकरे यांनी शिवसेनेचे रवी मुंडे यांचा अवघ्या ७३ मतांनी पराभव केला होता .Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.