ETV Bharat / state

Rohit Pawar Met Ajit Pawar : सरकारमध्ये फक्त अजित पवारच कार्यक्षम; रोहित पवारांकडून स्तुतीसुमने - रोहित पवार

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात भेट घेतली. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर काका-पुतण्यांची ही पहिलीच भेट होती. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्ताने दोघेही विधानसभेत अनेकवेळा आमनेसामने आल्याचे दिसून आले होते. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नाबाबत त्यांची भेट घेतल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच सरकारमध्ये फक्त अजित पवार हेच कार्यक्षम असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 28, 2023, 5:25 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीसोबत बंड करत अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीही झाले. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने सर्व मंत्री आणि आमदार हे विधिमंडळात उपस्थित असतात. आज(28 जुलै) सकाळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात भेट घेतली. आहे.

भेटीचे राजकीय अर्थ काढू नका. स्पर्धा परीक्षा, कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीचा प्रश्न आणि पिक विमाबाबत मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी

राजकीय अर्थ काढू नये - राष्ट्रवादीतीली बंडानंतर पहिल्यांदाच काका-पुतण्यांची विधिमंडळात भेट झाली. याभेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. तसेच या भेटीनंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली होती. मात्र, यावर खुद्द रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीचे कोणतेही राजकीय अर्थ काढू नये, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

राजकीय चर्चा सुरू - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सध्या विधानभवनात आपल्या भाषणांमुळे चांगले चर्चेत आले आहेत. अजित पवार यांनीही विधानभवनात रोहित पवार हे अभ्यासू आणि चांगले वक्ते आहेत, असे म्हटले होते. यानंतर आज रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

स्पर्धा परीक्षा विषयासाठी भेट - रोहित पवार यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेच्या विषयासंदर्भात आपण अजित पवार यांची भेट घेतली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांकडून नऊशे रुपये आणि हजार रुपये अशी जी फी घेतली जाते ती कमी करण्यात यावी, अशी आपण त्यांच्याकडे मागणी केली आहे. याच परीक्षांसाठी राजस्थानमध्ये 600 रुपये देऊन एक कार्ड दिले जाते. त्या कार्डवर कितीही परीक्षा देता येतात. त्या संदर्भातही सरकारने विचार करावा अशी विनंती त्यांच्याकडे केली. तर आपल्या कर्जत- जामखेड मतदारसंघात पिक विमा भरताना अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्या अडचणी सोडवाव्यात अशी विनंती आपण अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील एका एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भातही आपण त्यांच्याशी चर्चा यावेळी केली, असे रोहित पवार यांनी सांगितले.

सरकारमध्ये फक्त अजित पवार कार्यक्षम - या भेटीदरम्यान आपण कुठेही अजित पवार यांच्याशी राजकीय चर्चा केली नाही. ते माझ्या कौतुकापर्यंतही पोहोचले नाहीत. पण मी जे भाषणात बोललो ते त्यांनी ऐकल्याचे त्यांनी सांगितले आहे. या सरकारमध्ये जर कोणाची काम करण्याची क्षमता असेल तर ती फक्त अजित पवार यांच्याकडेच आहे, असे मतही यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -

  1. Love Jihad : क्लासच्या नावाखाली अहमदनगर जिल्ह्यात लव जिहादचे रॅकेट; विधानपरिषदेत मुद्दा गाजला
  2. Rohit Pawar News : उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रोहित पवार यांनी विधानभवनातील आंदोलन घेतले मागे, सरकारला दिला 'हा' इशारा
  3. Rohit Pawar News: रोहित पवारांना दिलासा; भाजप आमदार राम शिंदेंनी दाखल केलेल्या एफआयआरला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.