ETV Bharat / state

Eknath Khadse : तर, माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, मुख्यमंत्र्यांशी बोलताना एकनाथ खडसे भावूक

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही पाठवलेल्या विमानानं वेळेवर उड्डाण केलं, नसतं तर माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, असं म्हणत खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Eknath Khadse
Eknath Khadse
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 4:12 PM IST

एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना

मुंबई Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते तथा विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. त्यानंतर खडसे यांना जळगाहून मुंबईला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आता खडसेंच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. तुम्ही पाठवलेल्या विमानानं वेळेवर उड्डाण केलं, नसतं तर माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, असं म्हणत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी केली एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईला नेण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या दरेहगावी होते.

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार : मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळं एअर ॲम्बुलन्स मिळाली. त्यामुळं एकनाथ खडसे यांना जळगाहून मुंबईच्या रुग्णालयात हलण्यात आलं. आता एकनाथ खडसे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. यावेळी एकनाथ खडसे भावूक झाल्याचं स्पष्ट व्हिडिओत दिसत आहे.

शस्त्रक्रियेदरम्यान हृदयविकाराचा झटका : एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना काळजी घेण्याचं अवाहन केलं. त्यानंतर एखनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. खडसे यांच्यावर मुंबईत अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट सुरू करून हृदय पुन्हा सुरू केल्याचं खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar meet Eknath Khadse : शरद पवारांनी घेतली एकनाथ खडसेंची बॉम्बे रुग्णालयात भेट
  2. Maratha Reservation : जरांगे पाटील यांचं उपोषण सोडायला मंत्री गिरीश महाजन गेले असते तर लोकांनी त्यांना मारलं असतं - खडसे
  3. Eknath Khadse On Raver Lok Sabha : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद उघड, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली 'ही' इच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.