ETV Bharat / state

MLA Amol Mitkari : राज्यपालांनी ठरवलेलंच दिसतंय, आम्ही महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही- मिटकरी - MLA Amol Mitkari Criticized Governor Koshyari

मुंबई दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पायात चपला घालुन छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची प्रतिकृती भेट दिली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी हा फोटो ट्विट (Criticized Twit) करीत, 'राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही' असं म्हणटलं आहे.

MLA Amol Mitkari
आम. मिटकरींचे राज्यपालांवर ट्विट द्वारे टिकाशस्त्र
author img

By

Published : Jan 6, 2023, 7:03 PM IST

Updated : Jan 6, 2023, 7:15 PM IST

मुंबई : महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्याची मालिका सर्व पक्ष नेत्यांकडून सुरू आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करत असून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध दोन्ही पक्षाकडून सुरू आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांकडून योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची प्रतिकृती भेट देण्यात आली. मात्र यावेळी राज्यपालांनी आपल्या पायातील चपला काढल्या नसल्याचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांच्याकडून ट्विट करण्यात (Criticized Twit) आला आहे.

MLA Amol Mitkari
आम. मिटकरींचे राज्यपालांवर ट्विट द्वारे टिकाशस्त्र

पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता : राज्यपाल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती हातात घेतली असताना पायातील चपला काढला नसल्याचे ट्विट मधून सांगण्यात आलं आहे. 'राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायत्राणे घालुन जर "शिवप्रतीमा" देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे?' असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप ज्येष्ठ नेते राम नाईक आणि अभिनेता आणि खासदार रवी किशन देखील उपस्थित होते. त्यामुळे या फोटो नंतर आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यपालांना पदावरुन हटविण्याची मागणी : याआधी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विविध ठिकाणी विविध वक्तव्ये केलीत. त्यानंतर त्यांना पदावरुन हटविण्याच्या मागणीवरुन अनेक मोर्चे व निदर्शेने करण्यात आली. तसेच सर्वपक्षीय भव्य मोर्चा देखील काढण्यात आला होता. तसेच अनेकदा कोश्यारी यांनी माफी देखील मागितली होती. आता परत एकदा मिटकरी यांनी ट्विट केलेला हा फोटो काय नवा वाद निर्माण करतो, ते बघण्यासारखे ठरेल.

संभाजी राजेंवरुन अद्याप वाद सुरुच : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते असा उल्लेख अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून राज्यभरात अजित पवार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते, असं म्हणणं म्हणजे द्रोह आहे असा टोला अजित पवार यांना लगावला होता.

Last Updated : Jan 6, 2023, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.