ETV Bharat / state

१ जूनला राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार घेणार प्रत्येक मतदारसंघाचा आढावा - MEETING

यात राज्यातील प्रत्येक मतदारसंघात आलेल्या अपयशाची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. पवार स्वतः यात पुढाकार घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय
author img

By

Published : May 30, 2019, 4:58 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी निराशा पसरली आहे. या निराशेतून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत ते प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

१ जूनला बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यात राज्यातील प्रत्येक मतदारसंघात आलेल्या अपयशाची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. पवार स्वतः यात पुढाकार घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक होत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीला आपली ताकद असलेल्या मतदारसंघात आणखी काय बदल करावे लागतील, यासाठीच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागविल्या जाणार आहेत.

Intro:शरद पवार घेणार राज्यातील प्रत्येक मतदार संघाची झाडाझडती

Body:शरद पवार घेणार प्रत्येक मतदार संघाची झाडाझडती; शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत चिंतन बैठक

मुंबई, ता.29 :

लोकसभा निवडणुकीत देशातील चित्र बदलेल आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला देशात चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती मात्र या निवडणुकीत अपेक्षित यश न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी निराशा पसरली आहे. या निराशेतून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे.
शनिवारी 1 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून स्वतः पवार हे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात आलेल्या अपयशाची माहिती घेण्यासाठी स्थानिक आमदार पदाधिकारी यांची झाडाझडती घेणार असल्याचे राष्ट्रवादी कडून सांगण्यात येते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक होत असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पक्षाध्यक्ष शरद पवार हे राज्यात आलेल्या अपयशाची आणि त्यामागील कारणांची माहिती घेत त्यांच्या सोबत चर्चा करणार आहेत. त्यासोबतच विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीला आपली ताकद असलेल्या मतदार संघात आणखी काय बदल करावे लागतील, यासाठीच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागविल्या जाणार असून त्यावरील अंतिम निर्णय शरद पवार हे घेणार असल्याचे सांगण्यात येते.

Conclusion:शरद पवार घेणार राज्यातील प्रत्येक मतदार संघाची झाडाझडती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.