ETV Bharat / state

अजित पवारांचे बंड कायम.. मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश? - NCP leaders to convince Ajit Pawar

एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अजित पवार भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार
author img

By

Published : Nov 24, 2019, 4:32 PM IST

मुंबई - भाजपच्या गोटात गेलेले राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची मनधरणी करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि त्यांचे निकटवर्तीय प्रयत्न करत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अजित पवार भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शनिवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मनधरणी करून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याचे आवाहनही केले. मात्र त्याला अजित पवार यांनी प्रतिसाद न दिल्याने या नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. तोच प्रयत्न आज(24 नोव्हेंबर) सकाळपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी आमदार विलास लांडे यांनी पवार यांची भेट घेतली. पुन्हा एकदा त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यात आपल्याला बरेच यश आले असून अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत येतील, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - रोहित पवारांचे अजितदादांना स्वगृही परतण्याचे आवाहन

दरम्यान, आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या माध्यमातून भाजपकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. दोन्हीही पक्ष आपापली बाजू मांडत आहेत. मात्र, अजित पवारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Intro:अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश?

mh-mum-01-ncp-ajitpavar-retu-ncp-7201153

मुंबई, ता. २४:
मागील दोन दिवसापासून भाजपच्या गळाला लागलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची मनधरणी करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह अजित पवार यांच्या जवळच्या आमदारांनाही अपयश आले आहे.
काल सकाळी राजभवन येथे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि त्यांच्या सोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. एका बड्या नेत्याला फोडून भाजपाने आपल्यात घेतले असल्याने कालपासून राष्ट्रवादीचे नेते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना अजित पवार हे भाजपकडे गेलेला निर्णय बदलतील असा विश्वास वाटतो, यामुळे त्यांची मनधरणी करून पुन्हा त्यांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल सुरुवातीला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे दिलीप वळसे-पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांची मनधरणी करून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याला अजित पवार यांनी प्रतिसाद न दिल्याने काल या नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते तोच प्रयत्न आज सकाळपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आला होता. आज सकाळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि त्यानंतर अजित पवार यांचे खास जवळचे समजले जाणारे माजी आमदार विलास लांडे यांनी पवार यांची भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यात आपल्याला बरेच यश आले असून अजित पवार हे पुन्हा राष्ट्रवादीत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मात्र भाजपाकडून अजितदादा हे आपल्या सोबतच आहेत असा दावा केला जात आहे. त्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दुपारी एक पत्रकार परिषद घेऊन यासाठीची माहिती दिली. तर पवार यांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.
सत्ता स्थापनेपासून ते नंतर होणाऱ्या घडामोडी पर्यंत सर्व शक्यतांचा विचार करून भाजपाने त्यासाठीची तयारी दर्शवली आहे या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा शेवट करण्यासाठी अजित पवार हे पुन्हा राष्ट्रवादी मध्ये येतील, आणि आपली भूमिका बजावतील यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना विश्वास वाटतो.त्यामुळे पवई येथील हॉटेल रेनेसान्स या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांच्या स्वगृही परत आणण्यावर अनेक आमदारांनी काही वेळापूर्वी मागणी केली असल्याचेही सांगण्यात येत आहे.Body:अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश?Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.