मुंबई : महिलांच्या सुरक्षेतेसाठी निर्भया पथक तयार करण्यात आले. या निर्भया पथकांसाठी निर्भयानिधीतून वाहन खरेदी करण्यात आली. मात्र आता हीच वाहने शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांच्या सुरक्षेतेसाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला (Use of Nirbhaya Nidhi vehicles for security) आहे. निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात (Shinde Group MLAs of Shiv Sena ) आहे. त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.
वाय प्लस दर्जाची सुरक्षा : एकीकडे मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलीसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्यासोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते, असेही जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले (security of Shinde Group MLAs) आहे.
सवाल उपस्थित : यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विषयाबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. जर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहन वापरली जात असेल तर ही शरमेची गोष्ट आहे, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला (NCP Leaders allegations) आहे.