ETV Bharat / state

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये हेमंत टकलेंची लागणार वर्णी? - governor appoint mlc

विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. गेल्या वर्षभरापासून यादीवर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव या यादीत समाविष्ट होते. मागील काही दिवसांपासून शेट्टी यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतली.

hemant takle
हेमंत टकले
author img

By

Published : Sep 3, 2021, 10:11 PM IST

मुंबई - राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचे घोंगडे भिजत पडले असताना, राजू शेट्टींच्या नाव रद्द करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हेमंत टकले यांची येथे वर्णी लावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. शिवसेना, कॉंग्रेस पक्षाच्या कोट्यातील नावे देखील वगळली जाणार असल्याचे ते म्हणाले.

हेमंत टकलेंची वर्णी -

विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. गेल्या वर्षभरापासून यादीवर राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव या यादीत समाविष्ट होते. मागील काही दिवसांपासून शेट्टी यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतली. सरकारची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत, राष्ट्रवादीने शेट्टी यांना यादीतून वगळले असून त्यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार आहे. टकले हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवाय, विधान परिषदेचा त्यांना दांडगा अनुभव आहे. सरकारची बाजू ते ठामपणे मांडतील, असा पक्षाला विश्वास आहे. सुधारित यादीत त्यामुळे टकलेंचे नाव समाविष्ट केल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, कॉंग्रेसकडूनही एक नावावर फुली मारली जाणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात -फडणवीस

राज्यपाल सकारात्मक, तर सरकारमध्ये मतभिन्नता -

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत, 12 आमदारांचा मुद्दा निकाली काढण्याची विनंती केली. राज्यपाल याबाबत सकारात्मक असल्याचे आघाडी सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी शासकीय नियमांवर बोट ठेवत, राजू शेट्टी यांचा पत्ता कापल्याचे वृत्त समोर आले. महाविकास आघाडी सरकार त्यानंतर जोरदार टीकास्त्र करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.