मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी शिंगणे हे देखील त्या शपथविधीला उपस्थित होते. दरम्यान, मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर याबाबत त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र सर्वांना सोबत घेऊन मंत्री पदाला न्याय देणार असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.