ETV Bharat / state

'राठोड आले आहेत, आता कामकाजही सांभाळतील'; नवाब मलिकांकडून पुन्हा पाठराखण - नवाब मलिक पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मत

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा कथितरित्या संबंध असल्याचे आरोप होत आहेत. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे मात्र, सरकारमधील मंत्र्यांनी राठोड यांना पाठिंबा दिला आहे.

Nawab Malik supports Sanjay Rathore
नवाब मलिक आणि संजय राठोड
author img

By

Published : Feb 25, 2021, 7:46 AM IST

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने पाठराखण केली जात आहे. बुधवारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राठोड यांना पाठिंबा दिला आहे. राठोड वीस दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती होते. बैठकीत त्यांच्याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित झाला नाही. आता ते परत आले असून विभागाच्या दैंनदिन कामकाजालाही सुरुवात करतील, असे मलिक यांनी सांगितले.

सूचक वक्त्याने भाजपची हवा गेली -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मंत्री राठोड यांच्यावर भाजपने राज्य सरकारला चांगलेच धारवेर धरले आहे. असे असताना महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड हे थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मलिक यांनी राठोड हे पुन्हा कामकाजाला सुरुवात करतील, असे सूचक वक्तव्य करून भाजपच्या दाबावाची हवा काढून टाकली. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांच्या नाराजीची माहिती नाही -

पोहरादेवी येथे मंत्री राठोड यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तत्काळ पोहरादेवी प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. सुमारे १० हजार लोकांवर तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे प्रकरण ताजे असताना मलिक यांनी, शरद पवार यांच्या नाराजीची माहितीच नसल्याचे सांगत हात झटकले.

तपासणीतून सत्य समोर येईल -

पूजा प्रकरणानंतर मंगळवारी मंत्री संजय राठोड हे पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाचे संकट सुरू असल्याने गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. मात्र, गर्दीला नेत्यांनी आवाहन केले होते का, याबाबत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठांना केंद्राने मोफत कोरोना लस द्यावी -

दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले गेले आहेत. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. ज्या नागरीकांना कोरोनाची लस परवडणार नाही, त्यांना केंद्र सरकारने मोफत लस द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारकडून जर शुल्क आकारून कोरोना लस देण्यात येणार असेल तर त्याची देखील सुरुवात लगेच करावी. ११ मार्चपर्यंत राज्यात अशी मोहीम राबवण्यास सुरू करावे. या कामात राज्य सरकार नक्कीच केंद्राला मदत करेल, अशी ग्वाही मलिकांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.