मुंबई : कथित दहशतवादी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. वैद्यकीय कारणास्तव ते रुग्णालयात दाखल आहेत. या संदर्भात आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी नवाब मलिक यांच्या वैद्यकीय अहवालानंतर जामीन फेटाळून लावला आहे. सक्त वसुली संचालनालयाने आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला प्रखरपणे विरोध केला. न्यायमूर्ती अनुजा देसाई यांनी ईडीची बाजू उचलून धरत नवाब मलिक यांना अखेर जामीन नाकारला आहे.
वैद्यकीय कारणास्तव जामीन : सक्त वसुली संचालनाच्या वतीने नवाब मलिक यांच्या वैद्यकीय अहवालावर काही प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, नबाब मलिक यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई तसेच आबाद फोंडा यांनी जोरदारपणे बाजू मांडली. सातत्याने त्यांनी नवाब मलिक त्यांची एक किडनी खराब आहे. दुसरी किडनी 85 टक्के खराब झाली आहे. त्यामुळेच वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन मिळणे जरुरी आहे, अशी बाजू मांडली. मात्र, ईडीचे नवाब मलिक यांच्या संदर्भातील युक्तिवादाने आणि अहवालाने समाधान झालेले नाही. त्यांनी या जामीन अर्जाला विरोध केला.
जामीनासाठी रंगले वाकयुद्ध : यानंतर नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी सांगितले की, न्यायालयासमोर मांडलेले वैद्यकीय अहवाल, सर्व कागदपत्रे आता समोर आहेत. सक्त वसुली संचालनालयाने या आधी मागील महिन्यात याबाबत वेळ मागून घेतला होता. सर्व वैद्यकीय अहवाल पाहणे, त्याचे आकलन करून घेणे त्यासाठी त्यांना वेळ हवा होता. असे त्यावेळेला ज्येष्ठ वकील अनिल सिंग यांनी बाजू मांडताना म्हटले होते. वैद्यकीय अहवालासाठी ईडीने वेळ वाढवून घेतलेला होता. वैद्यकीय अहवाल पाहून आता तरी या संदर्भात न्यायालयाने विचार करावा, असे नवाब मलिक यांच्या वकिलांनी म्हटले होते. न्यायालयासमोर इडी आणि नवाब मलिक यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांमध्ये युक्तिवाद प्रश्न आणि उत्तर असे सवाल जवाब रंगले होते.
हेही वाचा :