ETV Bharat / state

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण - जयंत पाटील लेटेस्ट न्यूज

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. सामान्य जनतेसह नेतमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Jayant Patil
जयंत पाटील
author img

By

Published : Feb 18, 2021, 9:55 AM IST

मुंबई - राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, तब्येत उत्तम असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही. मी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो,' असे ट्विट पाटील यांनी केले आहे.

जोपर्यंत कोरोनाचे उपचार सुरू आहेत तोपर्यंत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले काम करणार आहेत. १६ फेब्रुवारीला जयंत पाटील यांनी आपला ५९वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जयंत पाटील यांनी केलेले ट्विट
जयंत पाटील यांनी केलेले ट्विट

राज्यातील या नेत्यांनाही कोरोना झाला होता -

अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अब्दुल सत्तर, सुनील केदार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे, बच्चू कडू, मकरंद पाटील, किशोर जोरगेवार, ऋतुराज पाटील, प्रकाश सुर्वे, पंकज भोयर, माणिकराव कोकाटे, मुक्ता टिळक, वैभव नाईक, सुनील टिंगरे, किशोर पाटील, यशवंत माने, मेघना बोर्डीकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, चंद्रकांत जाधव, रवी राणा, अतुल बेनके, प्रकाश आवाडे, अभिमन्यू पवार, माधव जळगावकर, कालिदास कोलंबकर, महेश लांडगे, मोहन हंबरडे, अमरनाथ राजूरकर, मंगेश चव्हाण, गीता जैन, सरोज अहिरे, सदाभाऊ खोत, सुजित सिंग ठाकूर, गिरीश व्यास, नरेंद्र दराडे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.