मुंबई - राजकारणात शरद पवारसाहेबांना हरवण्याचा भाजपचा डाव म्हणजे, सर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील असेही पाटील म्हणाले.
-
मा. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील. #SharadPawar pic.twitter.com/6N6g5dBS10
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मा. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील. #SharadPawar pic.twitter.com/6N6g5dBS10
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 24, 2019मा. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील. #SharadPawar pic.twitter.com/6N6g5dBS10
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 24, 2019
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे गटनेते असणारे अजित पवार यांनीच भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांचा हा निर्णय वैयक्तीक असून, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, मी राष्ट्रवादीतच असून शरद पवार हेच माझे दैवत असल्याचे अजित पवार सांगत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.