मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत असला तरी आमच्यात काहीही मतभेद नाहीत. त्यासाठी योग्यवेळी तारीख ठरेल आणि विस्ताराचा कार्यक्रम होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत दिली. तसेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील असेही ते म्हणाले.
हेही वाचा - समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार
राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आज होण्याची शक्यता होती, मात्र काँग्रेसच्या दिरंगाईमुळे तो अजूनही लांबणीवर पडला आहे. त्यासंदर्भात जयंत पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की, काँग्रेसच्या यादीबाबत दिल्लीत चर्चा सुरू होती. त्यांची काही अडचण नाही, यामुळे लवकरच याविषयाची कार्यक्रम जाहीर केला जाईल असेही ते म्हणाले. तसेच कर्जमाफीसंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर पाटील यांनी टोला लगावत कर्जमाफीसाठी कोणतीही दिरंगाई होणार नाही, आम्ही नीट अंमलबजावणी करू मात्र आता काही लोक विरोधात बसल्यामुळे ते बोलत आहेत. परंतु आम्ही सगळ्यात सुलभ,सहजरित्या मिळवून देणार असल्याचे त्याचे भाजपाला वाईट वाटत असेल असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा - आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू करणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन