ETV Bharat / state

MNS Toll Vandalism : टोलनाका फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

नाशिक जिह्यातील समृद्धी महामार्गावरील सिन्नर येथील टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड ( MNS Toll Vandalism ) केल्याचे समोर आल आहे. तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांकडे ट्विटच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.

MNS Toll Vandalism
MNS Toll Vandalism
author img

By

Published : Jul 23, 2023, 9:13 PM IST

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील सिन्नर येथील टोल नाक्यावर तोडफोड ( MNS Toll Vandalism ) करणाऱ्या मनसेच्या (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Home Minister Devendra Fadnavis ) यांच्याकडे ट्विटद्वारे कारवाईची मागणी केली आहे.

Tweet by Clyde Crasto
क्लाईड क्रास्टो यांचे ट्विट

अमित ठाकरे सोबत गैरवर्तन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर ( Amit Thackeray on North Maharashtra Visit ) आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत संवाद साधण्याचे काम सध्या ते करत आहे. नाशिक दौऱ्या दरम्यान शिर्डीकडे जात असताना सिन्नर टोलनाक्याजवळ अमित ठाकरे यांच्या वाहणाला अडवले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत मॅनेजर, तेथील कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडल्याची माहिती समोर आली आहे.

टोल कर्मचाऱ्यांनी सांभाळून बोलावे : अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्टॅग लावलेला आहे. त्यांची गाडी टोलनाक्यावर गेली असता, टोलनाक्यावरील गाडीसमोरील खांब तांत्रिक बिघाडामुळे वर झाला नाही. याबाबत कार्यकर्त्यांनी टोल कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी उद्धटपणे दिल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. टोल कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे बोलायला नको होते असे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.

कायद्याचा धाक राहिला नाही : समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यांचे नेते राज ठाकरे हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहे. असे कार्यकर्त्यांना वाटत असावे म्हणून, कार्यकर्त्यांना कायद्याची भीती वाटत नसावी. त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी गृहमंत्री फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्लाईड क्रास्टो यांनी ट्विटच्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Amit Thackeray : साहेबांमुळे 65 टोलनाके बंद, आता माझ्यामुळे एक बंद'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.