मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीत पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी आणि विरोधकांच्या दुखऱ्या बाबींवर बोट ठेवत त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजप- शिवसेनेवर हल्लाबोल करण्यासाठी ४० स्टार प्रचारक नेमले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर... #NCP2019 #NCP #LokSabhaElections2019 pic.twitter.com/zHnZxXmjWq
— NCP (@NCPspeaks) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर... #NCP2019 #NCP #LokSabhaElections2019 pic.twitter.com/zHnZxXmjWq
— NCP (@NCPspeaks) March 25, 2019आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर... #NCP2019 #NCP #LokSabhaElections2019 pic.twitter.com/zHnZxXmjWq
— NCP (@NCPspeaks) March 25, 2019
या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, शंकरसिंग वाघेला, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे याचा समावेश आहे.
याशिवाय माजी मंत्री भास्करराव जाधव, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप सोपल, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शब्बीर विद्रोही, खासदार माजीद मेमन, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, वर्षा पटेल, सुषमा अंधारे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, जयंत पटेल आदींचा समावेश आहे.