मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) राज्यसभेवरील ( Rajya Sabha ) महाराष्ट्रातील सहा खासदारांपैकी एक खासदारसाठीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. सोमवारी (30 मे) प्रफुल्ल पटेल आपला उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
राज्यसभेवरील ( Rajya Sabha ) सहा खासदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या जागांसाठी होणार्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) कोट्यातून एक उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरच विश्वास दर्शवला आहे.
महाराष्ट्रातून एकूण सहा जागांपैकी भारतीय जनता पक्षाकडून दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून प्रत्येकी एक खासदार त्यांच्या असलेल्या कोट्यातून जाणार आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दावा उपस्थित केला असून यासाठी शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनीही दावेदारी उपस्थित केली होती. मात्र, शिवसेनेने संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा नाकारल्यानंतर सहाव्या जागेसाठी निवडणुकीची चुरस वाढणार आहे.
हेही वाचा - नरेंद्र मोदी सरकारच्या 8 वर्षात सर्वसामान्यांना काय मिळाले?