ETV Bharat / state

NCP Chief Appointment : शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोण असेल ? जाणून घ्या सविस्तर - सुप्रिया सुळे प्रोफाईल स्टोरी

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावनिक झाले असून, शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असे पक्षातील आणि विरोधी लोक बोलत आहे. त्यांच्या मनधरणीसाठी आग्रह धरला आहे. या राजकीय घडामोडींकडे लक्ष असताना शरद पवार यांचे राजकीय वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

NCP Chief Appointment
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोण
author img

By

Published : May 3, 2023, 12:58 PM IST

मुंबई : २ मे रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. एकदा निर्णय घेतला की तो बदलत नाही, अशी ओळख शरद पवारांची आहे. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे अध्यक्षपदाच्या राजीनामाचा पुनर्विचार होईल का? की पक्षाला नवे अध्यक्ष मिळेल, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली आणि महाराष्ट्र असे दोन अध्यक्ष देण्याचा पवार यांचा विचार असल्याची माहिती आहे. मात्र, शरद पवार यांनी आधीच वारसदार ठरवल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र अजित पवारांकडे सोपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

जयंत पाटील यांना अध्यक्षपद मिळेल याची खात्री नाही : आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या पण तुम्ही राजीनामा देऊ नका. तुम्ही थांबलात तर आम्ही थांबू, अशा घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर जयंत पाटील यांनी दिल्या. शरद पवारांच्या या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामादेखील पाहायला मिळाला. शरद पवारांच्या या निर्णयानंतर जयंत पाटील ढसाढसा रडले आणि पवारांना राजीनामा मागे घेण्यास विनंती केली. जयंत पाटीलांनी हा हाय होल्टेज ड्रामा मुद्दाम केल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटलांना अध्यक्षपद मिळेल याबाबत शंका व्यक्त होत आहे.

प्रफुल्ल पटेल यांचे राष्ट्रवादी अध्यधपदासाठी नाव घेतले जात आहे : राष्ट्रवादीचे विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे चार वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. याशिवाय ते पाच वेळा राज्यसभेचे खासदारही झाले. सुप्रिया सुळे यांनाही राष्ट्रवादीची कमान मिळू शकते : शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाही राष्ट्रवादीची कमान मिळू शकते, अशी चर्चा सगळीकडे आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी चुरस असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिया राष्ट्रवादीच्या खासदार आहेत.

अजित पवार यांचा राष्ट्रवादीत मोठा प्रभाव : शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादीत मोठा प्रभाव आहे. अलीकडे अजित पवार पक्षातील काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. 2019 मध्येही त्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे सरकार स्थापन केले.

हेही वाचा : Nitesh Rane News: शकुनी मामाला लाज वाटेल असे संजय राऊत यांचे वर्तन- नितेश राणेंचे उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.