ETV Bharat / state

भाजप मेगाभरती पार्ट -२, 'हे' दिग्गज नेते करणार पक्षांतर?

author img

By

Published : Aug 31, 2019, 11:05 PM IST

Updated : Aug 31, 2019, 11:59 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला चांगलेच पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आता येणाऱ्या आठवड्यातही काही नेते आणखी भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

'हे' दिग्गज नेते करणार पक्षांतर?

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला चांगलेच पेव फुटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

हे नेते करणार प्रवेश
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महारांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू आहेत. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाचा राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

नारायण राणे
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे हे देखील आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करणार असल्याची माहिती मिळते आहे. भाजपने त्यांना राज्यसभेवरही पाठवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राणे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. अखेर या चर्चांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

रामराजे नाईक निंबाळकर
विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. रामराजे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीला मोठा धक्का असेल.

राणा जगजितसिंह पाटील
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगितले. मात्र,त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

धनंजय महाडिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यांचा भाजप प्रवेश हा कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा हादरा मानला जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सातत्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू होत्या.

जयकुमार गोरे
माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत गोरेंनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतर जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

Intro:Body:

new

Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 11:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.