मुंबई : भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काल पुन्हा एकदा आक्रमक झालेली पाहायला (NCP aggressive against Mangal Prabhat Lodha) मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात (comparing Shiv Rai with CM Eknath Shinde) आले.
जोरदार आंदोलन : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघातच हे जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित (NCP aggressive) होते.
विरोधात घोषणाबाजी : राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतापगडावर शासकीय कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या ताब्यातून आग्र्यावरून सटकले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून सटकली, अशी तुलना केल्यानंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात होता, तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदार संघात जाऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. मात्र ही घोषणाबाजी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीसांकडून नोटीस देखील बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांना पोलीसांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात केलेली घोषणाबाजी आणि त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा दिलेला इशारा, यानंतर ही नोटीस बजावण्यात आली (Mangal Prabhat Lodha comparing Shiv Rai with CM) आहे.