ETV Bharat / state

सारा अली खान चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात - सारा अली खान लेटेस्ट न्यूज

एनसीबीच्या कार्यालयात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरची चौकशी सुरू आहे. तर यापाठोपाठ सारा अली खानही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.

सारा
सारा
author img

By

Published : Sep 26, 2020, 1:15 PM IST

Updated : Sep 26, 2020, 1:46 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तपास सुरू आहे. एनसीबीच्या कार्यालयात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरची चौकशी सुरू आहे. तर, यापाठोपाठ सारा अली खानही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. चौकशीसाठी सारा अली खान गोव्याहून मुंबईला परतली आहे.

कथित ड्रग संदर्भातील व्हाट्सअॅप चॅट बद्दल एससीबी चौकशी करणार आहे. सारा अली खान व श्रद्धा कपूर या दोघी सुशांत सिंग राजपूत सोबत त्याच्या लोणावळा येथील फार्महाऊसवर जात होत्या. त्या ठिकाणी अमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याचेही एनसीबीच्या तपासात समोर आले आहे.

सुशांतसिंह राजपूत हा 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थ प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात काही ड्रग्ज पेडलरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आपले जबाब दिले. त्यानंतर बॉलिवुडमधील अनेकांची नावे समोर आली आहेत.

Last Updated : Sep 26, 2020, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.