मुंबई - अमली पदार्थ बाळगणे व त्याचे सेवन करणे, या गुन्ह्यांसंदर्भात अटक करण्यात आलेली कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचीया यांना मिळालेल्या जामीन विरोधात अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून एनडीपीएस न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात कॉमेडियन भारती सिंह हिच्या मुंबईतील अंधेरीस्थित घरावर एनसीबीकडून छापा मारण्यात आला होता. त्यात भारतीच्या ताब्यातून 86 ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर भारती व तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांना अटक करण्यात आली होती. या दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत भारती सिंह, हर्ष लिंबाचीया यांनी अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे मान्य केले होते. फोर्ट न्यायालयात दोघांची 15 हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
तस्करांपैकी काहींनी भारती सिंह व तिच्या पतीला ड्रग्स पुरवल्याची दिली कबुली
यानंतर एनसीबीने केलेल्या कारवाईदरम्यान अंधेरी-वर्सोवा परिसरातून काही ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली होती. या तस्करांपैकी काही जणांनी भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांना अमली पदार्थाचा पुरवठा केल्याचे कबूल केले होते. त्यानंतर एनसीबी एनडीपीएस न्यायालयामध्ये भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहे.
हेही वाचा - आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात 'आयएमए डॉक्टर' आक्रमक