मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर यासंदर्भात ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडुन तपास केला जात आहे.या प्रकरणात फरार आरोपी व त्याचा मित्र सिद्धार्थ पीठाणी, यास हैदराबाद येथून अटक केल्यानंतर या प्रकरणी आता सुशांतसिंग राजपूत यांच्या घरातील नोकर, नीरज व केशव या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले आहे.
सिद्धार्थ पीठाणी याला हैदराबाद येथून अटक केल्यानंतर, त्यास ट्रांजिस्ट रिमांड घेऊन मुंबईतील न्यायालयामध्ये एनसीबी कडून हजर करण्यात आले होते. सिध्दार्थची रवानगी 1 जून पर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आलेली आहे. दरम्यान 14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूत याने त्याच्या वांद्रा स्थित घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या वेळेस मोठा वाद निर्माण झाल्यानंतर, मुंबई पोलिस तपास करत असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सदरचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयकडे तपास आल्यानंतर यात चौकशी जरी झाली होती. परंतू त्याचा अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नाहीये.
ईडी कडून तपास
याबरोबरच सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी, ईडी कडून तपास केला जात असताना काही व्हाट्सअप चॅट हे अमली पदार्थांच्या संदर्भात मिळाल्यानंतर सदरचे व्हाट्सअप चॅट ईडी कडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आले होते. त्यानंतर एकामागून एक अमली पदार्थांच्या तस्करीत बद्दलचा उलगडा एनसीबी कडून केला जात होता. याप्रकरणी आतापर्यंत रिया चक्रवर्ती , शोविक चक्रवर्ती सह अनेक जणांची चौकशी करण्यात आलेली होती. यामध्ये रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांना अटक झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. एनसीबी कडून या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू असून या प्रकरणी कुठल्याही संशयिताला क्लीनचीट देण्यात आली नसल्याचे एनसीबी ने म्हटले आहे.
हेही वाचा-कंगनाच्या बॉडीगार्डला अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटक