ETV Bharat / state

Mumbai Crime News: एलएसडी औषधाचे 15,000 ब्लॉट्स जप्त, दोन दशकांमधील एनसीबीची सर्वात मोठी कारवाई - एलएसडी औषधाचे 15000 ब्लॉट्स जप्त

एनसीबीने अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात दोन दशकामधील सर्वात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने एलएसडी या अमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा भांडाफोड केला आहे. याबाबत एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

NCB Seized 15000 bloats of LSD
एलएसडी औषधाचे 15000 ब्लॉट्स जप्त
author img

By

Published : Jun 6, 2023, 1:58 PM IST

Updated : Jun 6, 2023, 2:29 PM IST

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने संपूर्ण भारतातील अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍या कार्टेलचा पर्दाफाश केला आहे, अशी माहिती एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले, की ड्रग कार्टेलचे संपूर्ण देशात नेटवर्क आहे. यामधील आरोपी आर्थिक देवाण-घेवाणीसाठी क्रिप्टोचलनाचा वापर करत होते. गेल्या दोन दशकांमधील सर्वाधिक एलएसडी जप्त करण्यात आले आहे.

एलएसडी ( lysergic acid diethylamide ) हे कृत्रिम रसायन आधारित औषध आहे. दोन प्रकरणांमध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे. एलएसडी औषधाचे 15,000 ब्लॉट्स जप्त करण्यात आले आहेत. हे व्यावसायिक प्रमाणापेक्षा जास्त आहे. हे सिंथेटिक औषध असून खूप धोकादायक आहे. या अमली पदार्थाच्या तस्करीचे एक मोठे नेटवर्क आहे. हे नेटवर्क पोलंड, नेदरलँड, यूएसए, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेले होते. तस्करांनी गुन्ह्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि डार्कनेटचा वापर केला. एनसीबीने 2.5 किलो गांजा, 4.65 लाख रुपये आणि बँक खात्यात जमा केलेले 20 लाख जप्त केल्याचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

  • #WATCH | We've arrested 6 persons in two cases and seized 15,000 bloats of LSD drug which is 2.5 thousand more than the commercial quantity. The commercial quantity of this drug is .1 gram. It's a synthetic drug and is very dangerous. It's the biggest seizure in the last 2… pic.twitter.com/Qes0uU816O

    — ANI (@ANI) June 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गोव्यातही सापडले होते एलएसडी: या वर्षाच्या एप्रिलच्या सुरुवातीला, एनसीबीने गोव्यातील कार्टेलच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. एनसीबीने दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध कडक मोहिम राबविली होती. या कारवाईत दोन रशियन नागरिकांसह तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून भारतीय आणि विदेशी चलनांसह ड्रग्ज, बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रेही जप्त करण्यात आली. विविध प्रकारच्या अमली पदार्थांसह, एकूण रक्कम 4 लाख 88 हजार रुपये, 1829 डॉलरसह इतर रक्कम जप्त करण्यात आली होती.

हेही वाचा

  1. Drugs Seized In Ocean: एनसीबीची सर्वात मोठी कारवाई! सुमारे 2,500 किलो अमली पदार्थ जप्त; संशयित पाकिस्तानीला अटक
  2. Pune Crime: ५ कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त; पुणे पोलिसांची कारवाई
  3. Drugs Gang Busted In Delhi : अफगाणिस्तानातून कच्चा माल आणून बनवत होते ड्रग्ज, पोलिसांनी केला मोठ्या टोळीचा पर्दाफाश

Last Updated : Jun 6, 2023, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.