ETV Bharat / state

आर्यन खान प्रकरणातून मला हटवले नाही - एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची प्रतिक्रिया - sameer wankhede controversy

मला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून हटवले गेलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे.

ncb officer sameer wankhede
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे
author img

By

Published : Nov 5, 2021, 7:55 PM IST

Updated : Nov 5, 2021, 10:34 PM IST

मुंबई - मला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून हटवले गेलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे. हे दिल्ली आणि मुंबई एनसीबीच्या पथकाचे समन्वय आहे, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

ncb officer sameer wankhede reaction to ani over transfer during aryan khan case investigation
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेले ट्विट

दरम्यान, एनसीबीच्या निर्णयानंतर उद्या शनिवारी दिल्ली एनसीबीचे पथक मुंबईत दाखल होलणार आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह इतर पाच प्रकरणांचा तपास हे पथक करणार आहे.

एनसीबीने प्रेसनोटमध्ये काय म्हटले?

मुंबई एनसीबीकडे असलेल्या सहा प्रकरणाचा तपास एनसीबीचे एसआयटी पथक करणार आहे. एनसीबीच्या महासंचालकांकडून हे एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच तपास करण्यात येत असलेल्या या प्रकरणांच्या तपासातून कोणत्याही अधिकाऱ्याला काढण्यात आलेले नाही, आधीचे सर्व अधिकारी तपासात असतील, असे स्पष्टीकरण एनसीबी दिल्लीकडून देण्यात आले आहे. याचा अर्थ असा आहे की, एनसीबी देशात सर्व ठिकाणी एकात्मिक संस्था म्हणून काम करते.

ncb press release
एनसीबीची प्रेस रिलीज

समीर वानखेडे अमली पदार्थ प्रकरणांचे स्पेशालिस्ट

समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील प्रादेशिक संचालक आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली होती. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी

समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून 2004 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. सुरूवातीला त्यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. कामातील नैपुण्य बघून त्यांना विभागाने काही प्रकरणांच्या तपासासाठी आंध्र प्रदेश आणि दिल्लीतही पाठविले होते. अमली पदार्थांशी निगडीत बाबींचे तज्ज्ञ म्हणून वानखेडेंची ओळख आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईतील एका ड्रग्स प्रकरणाशी निगडीत कारवाईदरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्लाही झाल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते.

समीर वानखेडे क्रांती रेडकरचे पती

अनेकांना हे माहिती नसेल की, समीर वानखेडे हे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी 2017 साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला होता. अत्यंत गुप्तपणे केलेल्या या विवाहाला फक्त मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यांना जुळी मुले आहेत.

Last Updated : Nov 5, 2021, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.