ETV Bharat / state

Goa Drug Racket Arrested: गोव्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड; ऑलम्पिक विजेती आणि माजी पोलिसाला अटक

अंंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी)-गोवाने काल(शुक्रवारी) आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड केला आहे. अटकेतील आरोपींकडून अनेक प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. प्रकरणी 2 परदेशी नागरिकांसह एका भारतीयाला अटक करण्यात आली असल्याची माहिती 'एनसीबी'चे झोनल डायरेक्टर अमित गावडे यांनी आज (शनिवारी) दिली आहे. यातील एक महिला ड्रग तस्कर ही ऑलंपिक रौप्य पदक विजेती तर दुसरा परदेशी आरोपी हा माजी पोलीस कर्मचारी आहे.

Goa Drug Racket Arrested
ड्रग जप्त
author img

By

Published : Apr 29, 2023, 7:14 PM IST

मुंबई: ड्र्ग तस्कारांविरोधातील ही कारवाई दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालली. अटकेतील पाचही आरोपींकडून परदेशी चलने, बनावटी कागदपत्रे, आयडी, सामग्रीसह विविध प्रकारचे ड्रग्स जप्त केले गेले.

विदेशी महिलेस ड्रगसह अटक: एक रशियन महिला कार्टेल गोव्यातील अरामबोल आणि लगतच्या भागात ड्रग तस्करीत सक्रिय असल्याची माहिती 'एनसीबी'ला मिळाली होती. विस्तृत इंटेल वर्कआउटनंतर एस. वर्गानोवा नावाच्या रशियन महिलेची ओळख पटली. ही केवळ परदेशी लोकांसाठी ड्रग्जविक्री करीत होती. त्यानुसार, तिच्यावर पाळत ठेऊन 13 एप्रिलला गुप्त माहितीच्या आधारे अरंबोल येथे अटक करण्यात आली. यावेळी 'एनसीबी'ने तिच्याकडून विविध प्रकारचे ड्रग जप्त केले.

इतर तस्कराचा उलगडा: अटक रशियन महिलेने 'एनसीबी' चौकशीत आकाश नावाच्या स्थानिक व्यक्तीचे नाव सांगितले. हा आरोपी मोठ्या ड्रग्ज जाळ्याचा भाग होता आणि एका रशियन व्यक्तीच्या सांगण्यानुसार काम करत होता. त्यानुसार 'एनसीबी' पथकाने आकाशवर पाळत ठेवून त्याला 28 एप्रिल रोजी अरंबोल येथून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे विविध प्रकारचे ड्रग आणि 28 हजार रुपये रोख आढळून आल्याने त्याला बेड्या ठोकल्या.

'हायड्रोपोनिक' तण विक्री: त्याच दिवशी गोव्यातील मँडरेम परिसराभोवती पाळत ठेवली असता आंद्रे नावाच्या रशियन नागरिकाला 20 'एलएसडी' ड्रग्जसह पकडण्यात आले. त्याच्या घराच्या झडतीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा ड्रग्जसाठा सापडला. 'एनसीबी'च्या चौकशी दरम्यान तो राहत्या घरी 'हायड्रोपोनिक' तण पिकवत असल्याचे निदर्शनास आले. या तण लागवडीची 3 भांडी (कुंडी) जप्त करण्यात आली.

भारतात येऊन ड्रग तस्करी: ड्रग तस्करीतील आरोपी रशियन महिला एस. वर्गानोवा ही जलतरणात 1980ची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती आहे. तर आंद्रे हा रशियामधील माजी पोलीस आहे; परंतु गोव्यात त्याने दीर्घकाळापासून 'किंगपिन' म्हणून कार्टेलची स्थापना केली होती. ड्रग तस्करीचे नेटवर्क पसरवण्यासाठी त्याने अनेक शहरांना भेटीही दिल्या होत्या आणि रस्त्यावरील ड्रग तस्करांचे मजबूत नेटवर्क व्यवस्थापित करत असल्याची माहिती तपासात उघड झाली.

हेही वाचा: Building Collapsed In Bhiwandi : भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, 20 ते 25 नागरिक अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.